नामाबद्दल विशेष माहिती सांगून , नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला ‘ विशेषण ‘ असे म्हणतात .
विशेषणांचे मुख्य तीन प्रकार
- गुणविशेषण
- संख्याविशेषण
- सार्वनामिक विशेषण
विशेषणाच्या व्याख्या :
- दामले : ” जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण असे म्हणतात .”
- चिपळूणकर : ‘ ज्या प्रातिपदिकाचा अन्वय दुसऱ्या प्रतिपदिकाशी होतो त्या प्रातिपदिकास विशेषण असे म्हणतात’ .
- कृ. पां. कुलकर्णी : गुणांचा दर्शक असे जे शब्द किंवा वस्तूंच्या विशेष्यांचे जे दर्शक शब्द असतात , त्यांना व्याकरणात विशेषण असे म्हणतात .
- ग. ह. केळकर : नामाचा गुण दाखवून त्याच्या अर्थाची व्याप्ती मर्यादित करणारा जो सविकारी शब्द असतो त्याला विशेषण म्हणतात .
- अधिक वाचा विभक्ती व त्याचे प्रकार | Vibhakti in marathi
सिद्ध विशेषण :
ज्या विशेषणांना मागे किंवा पुढे उपसर्ग अथवा प्रत्यय नासतो अशा मूळ विशेषणांचा सिद्ध विशेषणात समावेश होतो .
उदा . उंच , लहान , पिवळा , काळा
साधित विशेषण :
मूळ विशेषण सोडून इतर जातीच्या शब्दांपासून तयार केलेल्या विशेषणांना साधित विशेषणे म्हणतात .
1) नामसाधित विशेषण :
एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या नामाचाच वापर केला जातो . तेव्हा त्यास नामसाधित विशेषण म्हणतात .
- माझ्या भावाचे कापड दुकान आहे .
- त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे .
- मला सातारी पेढे आवडतात .
- अधिक वाचा सर्वनाम व त्याचे प्रकार| मराठी व्याकरण | Sarvanam in marathi |
2) सार्वनामिक विशेषण :
मूळ सर्वनामांचा उपयोग विशेषणासारखा केल्यास ती सार्वनामिक विशेषण होतात . ही विशिषणे फक्त अधिविशेषणे म्हणून वापरता येतात .
उदा . तो मुलगा , तो कावळा , ते फळ , ती मोटार .
3) सर्वनामसाधित विशेषणे :
एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी सर्वनामाला प्रत्यय जोडून तयार केलेल्या विशेषणांना सर्वनामसाधित विशेषणे म्हणतात . ही विशेषणे अधी व विधी अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात .
4) धातुसाधित विशेषणे :
क्रियापदातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात . धातूंना प्रत्यय जोडून त्यांचा नामापूर्वी विशेषणासारखा उपयोग केला जातो .
उदा. पिकलेला आंबा , रांगणारे मूल , पेटती ज्योत , वाहती नदी
5) अव्ययसाधित विशेषणे :
वर , खाली , मागे , पुढे या मूळ अव्ययांना प्रत्यय जोडून त्यांचा विशेषणप्रमाणे उपयोग केला जातो .
उदा . वरचा मजला , खालचे पुस्तक , मागील मोटार
अधिक वाचा 100+ समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in marathi.
6) परिनामवाचक विशेषणे :
संख्येत न मोजता येणाऱ्या नामांपूर्वी वापरलेल्या प्रमानदर्शक शब्दांना परिनामवाचक विशेषण म्हणतात .
उदा. काही साखर , थोडे पाणी
7) समासघटित विशेषणे :
दोन स्वतंत्र अर्थ असणारे शब्द परस्परसंबंधामुळे एकत्र आल्यास सामासिक शब्द तयार होतो . अशा शब्दांचा सुद्धा विशेषणाप्रमाणे वापर केला जातो .
उदा. पंचमुखी हनुमान , एकवचनी राम , नवरात्र महोत्सव