अनुवंश म्हणजे काय ? रंगसुत्रे आणि वंशाणू यांचे स्वरूप | What is genetics? Patterns of color and genetics
अनुवंश म्हणजे आई-वडिलांकडून आपल्याला जन्माबरोबर मिळणारी गुणसंपदा होय . माता-पितांच्या एकत्रित येण्याने पुढील पिढीला जो वारसा मिळतो त्यास अनुवंश असे म्हणतात . अर्थात नवीन पिढीला मिळालेली ही गुणवैशिष्ट्ये फक्त आई आणि वडील यांच्याकडून आलेली असतात असे नव्हे तर आईचे आई – वडील आणि वडिलांकडील आई – वडील आजी-आजोबा , एवढेच नव्हे तर दोन्हीकडील पणजोबा -पणजी याप्रमाणे पाठीमागील काही पिढ्यांमध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये नवीन पिढीमध्ये आलेली असतात . म्हणूनच अनुवंशची अशी व्याख्या केली जाते की, “दोन किंवा अधिक पिढ्यांमधून होणारे आणि व्यक्तीवर्तनास जबाबदार असलेल्या गुणांचे , क्षमतांचे आणि वैशिष्टयांचे संक्रमण म्हणजे अनुवंश होय . अशा प्रकारे पाठीमागील पिढीने पुढील गुणधर्म संक्रमित करणे म्हणजे अनुवंश यंत्रणा होय .
मानवी अपत्याचा जन्म पित्याच्या शरीरातील रेतपेशी आणि मातेच्या शरीरातील अंडपेशी यांच्या संयोगातून होतो . म्हणजेच स्त्री व पुरुषांच्या समागमानंतर गर्भधारणेची शक्यता निर्माण होते . लैंगिक परिपक्वता प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या शरीरात सर्वसाधारणपणे 28 दिवसानंतर एका अंडपेशीची उत्पत्ती होते , तर प्रत्येक पुरुषामध्ये दर 3 ते 4 दिवसांनी लक्षावधी रेतपेशी निर्माण होतात . मानवी जननपेशीत पेशीकेंद्रे असते . या पेशीकेंद्रामध्ये सूक्ष्म दंडाकार असे जे 46 घटक ( म्हणजेच 23 जोड्यांच्या स्वरूपातील घटक ) असतात त्यांनाच रंगसुत्रे असे म्हणतात . ही रंगसुत्रे DNA या द्रवाच्या अणूंनी बनलेली असून त्या अणूत 4 रासायनिक मूलद्रव्यांचे अतिसूक्ष्म परमाणू असतात . या परमाणूंच्या विशिष्ट रचनेलाच Genes असे म्हणतात . सर्वसाधारपणे प्रत्येक रंगसुत्रात अशा सूक्ष्म घटकांची संख्या 20,000 ते 42,000 अशी असते . या वंशाणूमुळे प्रत्येक व्यक्तीची चेहरेपट्टी उंची , वजन , रंग , केस आणि विविध अवयव ठरत असतात . मानवाच्या विविध गुणधर्माच्या निर्मितीचे अद्भुत बीज रंगसुत्रांतील हजारो वंशाणूमध्ये असते . हे वंशाणू मानवी गुणांचे वाहक असतात . म्हणूनच त्यांना अनुवंशाचे खरे संक्रमक किंवा गुणबीजे असे म्हणतात . वंशदाय किंवा अनुवंश यंत्रणेमध्ये रंगसुत्रे , वंशाणू व (DNA) यांचा समावेश होतो . अधिक वाचा किशोरांच्या आत्महत्या विषयी माहिती | Information about teen suicide in marathi
रंगसुत्रे (Chromosomes)
पुरुषांमधील रेतपेशी आणि स्त्रीमधील अंडपेशी यांच्यात प्रत्येकी एकूण 23 रंगसुत्रांच्या जोड्या किंवा 46 रंगसुत्रे असतात . प्रत्येकी मानवी अपत्याचा जन्म होताना पुरुषामधील 23 आणि स्त्रीमधील 23 रंगसुत्रांच्या जोड्या म्हणजेच 46 जोड्या एकत्र येतात . परंतु गर्भधारणेच्या वेळी फलितांड पेशीत मात्र 23+23 अशा 46 एकेरी रंगसुत्रांचाच समावेश होतो . म्हणजेच नवजात अर्भकास 46 रंगसुत्रेच मिळतात . आईवडिलांकडील नेमक्या कोणत्या रंगसुत्राचा संयोग घडून येईल हे केवळ योगायोगावर अवलंबून असते . म्हणूनच एका आई-वडिलापोटी जन्मलेली मुले वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांची असतात .
मानवी पेशीमधील केंद्रामध्ये रंगसुत्रे असतात . डी.एन.ए (DNA) च्या साहाय्याने लहान दोरीसारखी त्यांची रचना असून गोल गोल जिन्यासारखा त्यांचा आकार दिसतो . यामध्ये व्यक्तीच्या वंशदायाबाबतची माहिती असते. त्याला वंशाणू असे म्हणतात . या वंशाणूमध्येच वंशदायाच्या माहितीचा साठा असतो . हे वंशाणू रंगसुत्राच्या विशिष्ट ठिकाणी असतात . त्याला स्वत:चे असे एक स्थान असते . वंशाणू हेच खऱ्या अर्थाने वंशदायाचे संक्रमक होत . अधिक वाचा मध्यम वयातील शारीरिक बदलांविषयी माहिती| Information about physical changes in middle age
वंशाणू (Genes)
वंशाणूंना रंगमणी किंवा जन्यूपेशी असे म्हणतात . स्त्री-पुरुषामध्ये जी रंगसुत्रे असतात त्यामध्ये अनेक सूक्ष्म पेशी असतात . या सूक्ष्म जन्यूपेशी एकसंध नसून एखाद्या माळेप्रमाणे त्याची रचना असते . डॉ. वॅटसन आणि क्रीक यांनी सर्वप्रथम रंगसुत्रांची रचना शोधून काढली . रंगसुत्रामधील रंगमणी किंवा वंशाणू हे न्यूक्लिक अॅसिडचे दोन मुख्य भाग किंवा प्रकार पडतात 1) DNA -डी-ऑक्झिरिबो न्यूक्लिक अॅसिड आणि 2) RNA रिबोन्यूक्लिक अॅसिड . यापैकी DNA चा सूक्ष्म अंश म्हणून वंशाणूकडे पाहिले जाते . पेशीमध्ये सुमारे 1,00,000 वंशाणू असतात . प्रत्येक रंगसुत्रामध्ये असणाऱ्या वंशाणूंची संख्या सुमारे 20,000 ते 42,000 एवढी असते . DNA आणि RNA यांची रचना नागमोडी जिन्यासारखी असते . रंगसुत्रामधील हे वंशाणू म्हणजे आनुवंशिक वारसाचे खरे वाहक असतात . पाठीमागील पिढीकढून पुढील पिढीकडे विविध गुणवैशिष्ट्य संक्रमित करण्याचे कार्य वंशाणूमुळे केले जाते .
वंशाणूकडून वेगवेगळी कार्ये पार पाडली जातात . वेगवेगळे वंशाणू आणि त्यांच्याकडून पार पाडली जाणारी कार्ये यांचा नेमका संबंध शोधता आला तर व्यक्तीचा विकास कोणत्या दिशेने चालला आहे याबाबतचा अंदाज बांधणे शक्य होईल . व्यक्ती ज्या वातावरणात वाढते त्याचा वंशाणूच्या कामकाजावर परिणाम होतो . वंशाणू कशाप्रकारे व्यक्त होतील ते सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते . सूर्यप्रकाश , दिवस-रात्र , जीवनसत्वे आणि वातावरणातील विविध घटक यांचा वंशाणूंवर थेट परिणाम होतो . फ्लिंट या संशोधकाने या संदर्भात एक अभ्यास केला . त्याच्या मते , वारंवार ताणाला तोंड द्यावे लागल्यामुळे शरीरामध्ये ‘कॉर्टीसॉल ‘ या हार्मोनची निर्मिती होते . वाढलेल्या कॉर्टीसॉलमुळे रंगसुत्रामधील DNA चा पाचपट नाश होतो . तसेच DNA च्या कामकाजामध्ये बिघाड होतो .