किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरवस्थेतील शारीरिक बदल | What is Adolescence ?

Share

किशोरावस्था म्हणजे काय ?

किशोरावस्था याला इंग्रजीत ” Adolescence ” असा असून तो लॅटिन “ Adolescere ” या क्रियापदापासून तयार झालेला आहे . त्याचा अर्थ ‘ परिपक्वता लाभणे ‘ असा आहे . प्राचीन विचारसारणीनुसार लैंगिक परिपक्वता प्राप्त होण्याचा कालावधी आणि किशोरावस्था यांच्यात फरकच केला जात नसे . पियाजे या संशोधकाच्या मतानुसार किशोरावस्था याचा मर्यादित अर्थ न घेता शरीरीक विकासाबरोबर मानसिक , भावनिक आणि सामाजिक विकसाचाही यात समावेश केला पाहिजे .

बाल्य आणि तारुण्य यांना जोडणारा काळ म्हणून किशोरावस्थेकडे पहिले जाते . किशोरवयीन अवस्था आणि लैंगिक परिपक्वता असे समीकरणच आपल्याला पाहवयास मिळते . या कालावधीत मूला-मुलींमध्ये लैंगिक बदल झपाट्याने होतात . किशोरावस्था म्हणजे १३ ते २१ वयापर्यंतचा विकासाचा कालखंड होय . किशोरवस्थेला कुमारावस्था किंवा पौगंडावस्था असेही म्हणतात किशोरावस्थेमध्ये वर्तनातील बदल , विचारसरणी आणि मूल्ये यांच्यात इतका फरक पडतो की , त्यानुसार पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था असे दोन टप्पे पडतात . 13 ते 17 वर्षे वयापर्यंतचा कालखंड म्हणजे पूर्व किशोरावस्था होय . आणि 17 ते 21 व वर्षे वयापर्यंतचा कालखंड म्हणजे उत्तर किशोरावस्था होय .

boy standing beside girl outdoors

किशोरावस्थेमध्ये होणार विकास हा अत्यंत गतिमान असतो . शारीरिक विकास खूपच झपाट्याने होत असतो . पाहता पाहता मुले – मुली झाडासारखी वाढू लागतात . त्यांचे रंग – रूप , आकारमान व चेहरा बदलून जातो . किशोरावस्थेत आलेल्या मुला – मुलींना ओळखणे फारसे अवघड नसते . या कालखंडात त्यांचे वर्तन , आदर्श , मूल्ये यात बदल होत असतो . शारीरिक बदलाबरोबर मानसिक , भावनिक बदल घडून येऊ लागतात . लैंगिक परिपक्वता हे किशोरावस्थेचे ठळक वैशिष्टे होय . अधिक वाचा मानसोपचार म्हणजे काय ? त्याचा वापर कोण करू शकतो ? Psychotherapy – What is it ? who uses it ?

शारीरिक बदल

किशोरावस्थेच्या कालखंडात मुला-मुलींमध्ये घडून येणारे शारीरिक बदल हे अत्यंत वेगवान असतात . एखादी नाट्यपूर्ण घटना घडून यावी त्याप्रमाणे किशोरांमध्ये शारीरिक बदल घडून येतात . लैंगिक ते बरोबर अनेक शारीरिक बदल होत असतात . लैंगिक विकासाबरोबरच मानसिक , भावनिक व सामाजिक विकासाचा किशोरावस्थेमध्ये समावेश केला जातो . लैंगिक परिपक्वता प्राप्त झाल्याने नजरेत भरणारा व झपाट्याने होणारा लैंगिक विकास आणि वाढणारी उंची हीच किशोरावस्थेची ठळक वैशिष्ट्ये होत .

किशोरावस्थेदरम्यान घडून येणाऱ्या लैंगिक बदलांमुळे मुले बावरून जातात , मुली संकोचाने दबून जातात . शारीरिक बदलामुळे त्यांच्या वर्तनात बदल दिसू लागतो . सुरुवातीस मुलांची व मुलींची उंची , वजन समान गतीने वाढत असते . पण अचानक मुलींच्या वाढीचा वेग वाढतो . मुलांच्या तुलनेत अधिक गतीने त्यांच्या शरीरावर फरक दिसू लागतो संपूर्ण शरीररचनेत व आकारमानात फरक पडतो . मुलींमधील हे बदल मुलांच्या तुलनेत 1 -2 वर्षे अगोदर येतात . म्हणून एकाच वयाच्या मूला – मुलींचे वर्तन भिन्न असते . त्यांची लैंगिक इंद्रिये विकसित होतात . प्राथमिक व दुय्यम लैंगिक गुणवैशिष्ट्ये विकसित होतात . मुलींमध्ये मासिक स्त्राव सुरू होतो . मुलांमध्ये वीर्य निर्माण होण्यास सुरुवात होते .

प्राथमिक लक्षणे

मुले मुली
वीर्य निर्माण होणाऱ्या ग्रंथीचा विकास पूर्ण होतो स्त्रियांमधील अंडपेशी पूर्णपणे विकसित होते .
शीश्न आकाराने पुरेसे मोठे होते . गर्भनलिकेचा विकास पूर्ण होतो .
अंडासहाय गर्भाशयाची वाढ पूर्णपणे होते व अधिक सक्षम होते .
वीर्यवाहक नालिकेचा विकास पूर्ण होतो वीर्यपतनास सुरुवात होते . जननेंद्रिये पूर्णपणे विकसित होऊन प्रजननास योग्य बनते .

दुय्यम लक्षणे

मुले मुली
काखेमध्ये व शिश्नाभोवती केस येऊ लागतात .स्तनांचा आकार मोठा होतो .
दाढी-मिशा येऊ लागतात . काखेतमध्ये व जांघेमध्ये केस येतात .
आवाजात बदल होतो . आवाजात बदल होतो .
आवाज अधिक मोठा व घोगरा होतो .नितंबाची गोलाई वाढते व त्याच्या आकरमानात बदल होतो .
त्वचा राठ व जाड बनते . बाल्यावस्थेतील त्वचेचा मुलायमपणा निघून जातो . हाता – पायावर केस येतात . बाल्यावस्थेतील आवाजाच्या तुलनेत हा आवाज अधिक मोठा होता .
छाती रुंद होते . खांदे रुंद होतात . धडाचा आकारमान वाढते .त्वचा पातळ व मुलायम बनते . रंग उजाळतो व तारुण्याची सर्व लक्षणे दिसू लागतात .
अधिक वाचा मानसशास्त्र म्हणजे काय ? Psychology in Marathi ?

यादरम्यान किशोरवयीन मुला-मुलींच्या शरीररचनेमध्ये खूप मोठे बदल दिसून येतात . उंची व वजनामध्ये एकदम वाढ झाल्याचे आढळते . सुरुवातीस मुलांच्या तुलनेत मुलींची उंची अधिक असते . पुढे – पुढे मात्र मुलांच्या उंचीचा वेग वाढतो आणि त्याच वयाच्या मुलींच्या तुलनेत मुलांची उंची अधिक आढळते . पान नंतर मात्र जेव्हा 14 वर्षाचे वय होताच हा क्रम आणि वेग बदलतो . मुलांचे वजन मुलींपेक्षा जास्त असल्याचे आढळते . सर्व साधारणपणे मुलींमधील उंची आणि वजन यांचा विकास हा मुलांच्या तुलनेत 2 वर्षे अगोदर होतो .

संप्रेरकांमधील बदल ( Hormonal Change )

वाढत्या वयानुसार शारीरिक विकासाचा परिणाम म्हणून मुला- मुलींच्या शरीरभर वरीलप्रमाणे खाणाखुणा किंवा चिन्हे दिसू लागतात . शरीरांमध्ये विकास स्त्रावांच्या संप्रेरकांच्या निर्मितीस प्रारंभ झाल्याबरोबर मुलींची शरीररचना एकदम बदलते . त्यांचे वजन वाढते . अंडपेशींची वाढ पूर्ण होऊन त्यातून एस्त्रोजेन( Estrogen) नावाचे संप्रेरक निर्माण केले जाते . मुलांमधील रेतपेशींची वाढ पूर्ण होऊन त्यातून अँड्रोजेन व टेस्टोस्टेरॉन ही संप्रेरक निर्माण केली जातात . सर्वसाधरणपणे वयाच्या सातव्या वर्षापासून मुला-मुलींमध्ये ही संप्रेरक निर्माण होऊ लागतात . याचा परिणाम म्हणून एस्त्रोजेनमुळे स्त्रियांच्या स्तनांचा आकार वाढू लागतो . जननेंद्रिये विकसित होऊ लागतात . तर अँड्रोजेनमुळे पुरुषाच्या अंगावर केस येऊ लागतात व जननेंद्रिये विकसित होतात . तसेच टेस्टोस्टेरॉन युय संप्रेरकमुळे मुलांची उंची वाढते , धडाचा आकार वाढतो , हाता-पायावर केस येतात , आवाज फुटतो व जननेंद्रिये कार्यक्षम होतात . मुलींमध्ये स्त्रवणाऱ्या संप्रेरकास एस्त्रोजेन असे म्हणतात . त्यामध्ये एस्त्राडिओलचे प्रमाण मुलींमध्ये 18 पट वाढते , तर मुलांमध्ये फक्त 2 पट वाढते . टेस्टोस्टेरॉन व एस्त्राडिओलच्या प्रभावामुळेच पुरुषांच्या शरीरावर केस उगवतात तर स्त्रियांच्या स्तनांचा गोलाकार प्राप्त होतो व नितंबाचा आकार वाढतो .


Share

Leave a comment