प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2023 ऑनलाइन फॉर्म संपूर्ण माहिती |pm kisan samman nidhi yojana in marathi

Share

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2023 , ऑनलाइन फॉर्म ,अर्ज , लाभार्थी , वेबसाइट , पात्रता (pm kisan samman nidhi yojana in marathi , online form , Apply , Beneficiary , Benefit , Website , Eligibility )

Table of Contents

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2023 | pm kisan samman nidhi yojana in marathi

योजना pm kisan samman nidhi yojana
कोणी चालू केली केंद्र सरकार
कधी चालू झाली 1 डिसेंबर 2018
लाभार्थी देशातील अल्पभूधारक शेतकरी आणि लहान शेतकरी
आर्थिक मदत 6000 रुपये दरवर्षी
उद्देश देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक मदत करणे
अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन / ऑफलाइन
वर्ष 2023

what is pm kisan samman nidhi yojana( प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना काय आहे )

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना केंद्र सरकारद्वारे देशातील शेतकऱ्यांसाठी सुरुवात केलेली आहे . या योजनेची अंमलबजावणी 1 डिसेंबर 2018 पासून करण्यात आली . याचा लाभ कमी जमीन असलेले लहान शेतकरी यांना होणार आहे . प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये भेटणार आहे . या योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना रक्कम तीन हप्त्यांमध्ये डायरेक्ट बँक मधील अकाऊंटमध्ये जमा होणार आहे , तर योजनेवर वार्षिक खर्च 75,000 कोटी रुपयांचा अंदाज होता. मात्र देशातील शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने आणि या योजनेत शेतकऱ्यांचे हित असल्याने वार्षिक खर्चात वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेची यादी

क्र संख्याहप्ता तपशीलखात्यात हस्तांतरित केलेल्या रकमेचा तपशील
1 पंतप्रधान किसान योजनेचा पहिला हप्ताफेब्रुवारी 2019
2 पंतप्रधान किसान योजनेचा दूसरा हप्ता2 एप्रिल 2019
3पंतप्रधान किसान योजनेचा तिसरा हप्ता ऑगस्ट 2019
4पंतप्रधान किसान योजनेचा चौथा हप्ता जानेवारी 2020
5पंतप्रधान किसान योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 
6पंतप्रधान किसान योजनेचा सहावा हप्ता 1 ऑगस्ट 2020 
7पंतप्रधान किसान योजनेचा सातवा हप्ताडिसेंबर 2020 
8पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता1 एप्रिल 2021
9पंतप्रधान किसान योजनेचा नऊवा हप्ता09 ऑगस्ट 2021
10पंतप्रधान किसान योजनेचा दहावा हप्ता1 जानेवारी 2022 
11पंतप्रधान किसान योजनेचा अकरावा हप्ता14 – 15 मे 2022
12पंतप्रधान किसान योजनेचा बारावा हप्ता17 ऑक्टोबर 2022
13पंतप्रधान किसान योजनेचा तेरावा हप्ता27 फेब्रुवारी 2023
14पंतप्रधान किसान योजनेचा चौदावा हप्ता27 जुलै 2023

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना फायदे आणि वैशिष्टे

  • या योजनेचा फायदा देशातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे
  • शेतकऱ्यांना 6000 रुपयाचा लाभ होणार आहे .
  • हा लाभ तीन हप्त्यामध्ये होणार आहे म्हणजे दर चार महिन्याला 2000 रुपये डायरेक्ट अकाऊंट ला जमा होणार आहेत .
  • या मदतीमुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात मदत होईल.
  • थेट सेवा देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोबाईल अप्प्स सुरू करण्यात आले आहे.
  • अधिक वाचा नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना 2023 ऑनलाइन फॉर्म | Namo shetkari maha samman nidhi yojana in marathi .

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेची पात्रता

  • लहान व अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे .
  • शेतकरी कुटुंबांमध्ये पती, पत्नी, एक अल्पवयीन किंवा मुले असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारकडे जमीन असायला पाहिजे आणि ती शेतीयोग्य असावी .
  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा .
  • अर्जदार व्यक्तीचे बँक अकाऊंट आधार कार्डला लिंक असायला पाहिजे .
  • अर्जदार व्यक्तीकडे सर्व महत्वाचे कागदपत्रे असणे गरजेचे आहे .
  • अधिक वाचा 100+ समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in marathi.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना कागदपत्रे ( Document )

  • आधार कार्ड
  • NREGA जॉब कार्ड किंवा केंद्र/राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारने जारी केलेले इतर कोणतेही ओळखपत्र).
  • जमिनीची कागदपत्रे
  • अर्जदाराचे बँक खाते
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाइल नंबर

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ( Application )

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पहिल्यांदा pmkisan.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल .
  • त्यामध्ये नवीन शेतकरी नोंदणी ( new farmer registration ) वरती क्लिक करून तुमचा आधार नंबर , मोबाइल नंबर , राज्य निवडल्यानंतर कोड टाकून तुम्ही लॉगिन करू शकता .
  • त्यानंतर विचारलेली माहिती सर्व भरून फॉर्म सबमीट करा .

1) प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना काय आहे ?

Ans : ही योजना शेतकऱ्यांसाठी काढलेली योजना आहे .

2) प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेची सुरुवात कोणी केली ?

Ans : केंद्र सरकार

3) प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेची अमलबजावणी कधी करण्यात आली ?

Ans :1 डिसेंबर 2018

4)पीएम किसान हेल्पलाईन नंबर

Ans : 155261 / 011-24300606


Share

Leave a comment