बालगुन्हेगारी म्हणजे काय आणि त्याची कारणे ? What is juvenile delinquency and its causes

Share

बालगुन्हेगारी म्हणजे काय ? What is juvenile delinquency

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आढळून येणारी प्रमुख समस्या म्हणजे बालगुन्हेगारी होय . एखाद्या इंग्रजी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे 13 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुले चोरी , दरोडा , मारामारी यासारखे गुन्हेगारीचे वर्तन करताना आढळतात. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे संपूर्ण समाजव्यवस्था झपाट्याने बदलत चालली आहे . कुटुंबाचे विघटन व नियंत्रणाचा अभाव यामुळे लहान मुलांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता येऊ लागली आहे . “सामाजिक नियंत्रणासाठी व समाजिकीकरणासाठी जे नियम कायदे किंवा आदर्श मूल्ये समाजाने स्वीकारलेली असतात त्यांचे उल्लंघन करणे म्हणजे गैरवर्तन होय . ” बालकांकडून घडणारे असे गैरवर्तन म्हणजे बालगुन्हेगारी होय .

woman in black and white long sleeve shirt and black pants sitting on brown wooden stairs

भारतीय दंडविधान संविधानामध्ये बालन्याय कायदा – 1986 नुसार 7 वर्षे वयावरील पण 18 वर्षाखालील मुले मुली जेव्हा कायद्याच्या चौकटीत न बसणारे वर्तन करतात तेव्हा ती बालगुन्हेगार ठरतात . गुन्ह्यांचे एकंदर स्वरूप आणि परिणाम सारखेच असले तरी गुन्हा आणि बालगुन्हा यामागील हेतु किंवा प्रेरणा विविध स्वरूपाच्या असतात . गुन्हेगार जन्माला येत नसतात तर गुन्हेगार घडविले जातात . कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीतून गुन्हेगार निर्माण होतात . बालवयात जर गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन मिळाले तर प्रौढवस्थेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात . मुलांच्या शारीरिक व मानसिक गरजा पूर्ण करण्यात कुटुंबाला व समाजाला अपयश आले तर बालगुन्हेगारी निर्माण होते .

बालगुन्हेगारीची कारणे ( juvenile delinquency causes)

  • कनिष्ठ सामाजिक-आर्थिक दर्जा असणाऱ्या कुटुंबांमधील मुले – मुली चटकन बालगुन्हेगारीच्या वर्तनाकडे वळतात .
  • कनिष्ठ सामाजिक – आर्थिक स्तरांमधून येणाऱ्या समवयस्कांपुढे जे नकरात्मक व समाजविरोधी सामाजिक मानदंड असतात त्यामुळे काही जण बालगुन्हेगारीकडे वळतात .
  • कनिष्ठ आर्थिक स्तर किंवा दारिद्र्य यातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून बालगुन्हेगारीकडे पाहिले जाते .
  • बऱ्याच वेळा कुटुंबातून किंवा किंवा शेजाऱ्याकडून अशा प्रकारची चुकीची शिकवण मिळते की सामाजिक वर्चस्व प्रस्थ[पित करण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीची आवश्यकता असते . तसेच जेवढी समाजविरोधी , विघातक कृत्य अधिक तेवढी सामाजिक प्रतिष्ठा अधिक अशी धारणा बनलेली असते . त्यासाठी गुन्हेगारीचे वर्तन केले जाते .
  • समाजातील विशिष्ट जाती , धर्म किंवा पंथातील लोक गुन्हेगार असतात . अशा वातावरणात किंवा त्यांच्या सानिध्यात राहिल्याने लहान मुलांपुढे तोच आदर्श असतो . शिवाय संगतीच्या प्रभावामुळे मुले बालगुन्हेगार बनतात .
aerial view of houses
  • गरिबी , शिक्षणाचा अभाव , मुख्य प्रवाहापासून दूर फेकलेली कुटुंबे यामुळे बालगुन्हेगारीस खतपाणी घातले जाते .
  • कौटुंबिक विघटन , कौटुंबिक वातावरण , आई-वडील यांच्यातील भांडणे , पालकांकडून होणारी हेळसांड यामुळे मुले बालगुन्हेगारीकडे वळतात .
  • बालगुन्हेगारांचे पालकच मुळात अडाणी , अशिक्षित , व्यसनाधीन , गुन्हेगार व समाजविरोधी कृत्यात गुंतलेले असतात . त्यांच्या अनुकरणामुळेच मुलांमध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढीस लागते व ती बालगुन्हेगार बनतात .
  • गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणाऱ्या पालकांची मुले आपोआपच गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते .
  • आई-वाडिलांमधील बेबनाव , कलह , शिस्तीतील विसंगती किंवा कडक शिस्त यांचा मुलांच्या सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होतो . यामुळे बालगुन्हेगारी वाढते .
  • एकतर्फी प्रेम , लैंगिक वर्तनाबाबत असणारे जबरदस्त आकर्षण , भावनिक नियंत्रणाचा अभाव , कायद्याबाबत अजिबात भीती नसणे यांसारख्या कारणांमुळे ही मुले बालगुन्हेगारीकडे वळतात .

Share

Leave a comment