मराठी कविता | marathi poem| Marathi Kavita

Share

आठशे खिडक्या नवशे

आठशे खिडक्या नवशे दार

कुण्या वाटंनं बा गेली ती नार

अधिक वाचा 50+ समूहदर्शक शब्द | Samuhdarshk Shabd | Marathi Grammar

पैठणी नेसून झाली तयार

कुण्या वाटंनं बा गेली ती नार

ठुमकत मुरडत आली सामोरं

कुण्या वाटंनं बा गेली ती नार

बोलण्यात दिसतीया खडीसाखर

कुण्या वाटंनं बा गेली ती नार

हातात वाक्या न् दंडात येळा

वाऱ्यासंग बोलतूया बागशाही मळा

आल कस गेल कुठ , सळसळ वार

कुण्या वाटंनं बा गेली ती नार

अधिक वाचा 100+ समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in marathi.

नाकात नथणी न् कानात झुब

रखवलदार जणू बाजूला उभ

डौलान डुलतोया चंद्रहार

कुण्या वाटंनं बा गेली ती नार

करंगळ्या मासोळया जोडवी जोड

पैंजण रुणझुण लावतया याड

पाडाचा आंबा जणू रसदार

कुण्या वाटंनं बा गेली ती नार

जगता आलं पाहिजे

मरता केव्हाही येत

पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येत

पण दु:ख पचवता आलं पाहिजे

रंग सावळा म्हणून काय झालं

कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे

रंग गोरा असला म्हणून काय झालं

मनावरील काजळी काढता आली पाहिजे

यशानं माणूस उंच जातो

पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे

ताठ काय कोणीही राहतं

जरा झुकून वागता आलं पाहिजे

अधिक वाचा किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरवस्थेतील शारीरिक बदल | What is Adolescence ?

ठेच जीवनात लागतेच

सहन करता आलं पाहिजे

मलमपट्टी करून तिला

पुन्हा चालता आलं पाहिजे

शहण्याचं सोंग घेऊन

वेड होता आलं पाहिजे

कशाला बळी न पडता

आनंदी जगता आलं पाहिजे

जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल

ती उणीव भरता आली पाहिजे

हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून

फक्त समाधानी राहता आलं पाहिजे

आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे

वेळ आली तर तुलाही सांगेन आयुष्य कसं जगायच ..?

वेळ आली तर तुलाही सांगेन ,

आयुष्य कस जगायच असत .

एका-एका शब्दामधून

वाक्य कस बनवायचा असत .

वेळ आली तर तुलाही सांगेन

मन कस जिंकायच असत .

आवडी -निवडी सांगताना कस

मनात मन गुंतवायच असत .

वेळ आली तर तुलाही सांगेन,

स्पर्श कसा करायचा असतो .

नाजुक उमललेल्या ओठांवरून कसा

हळुवार हात फिरवायचा असतो .

वेळ आली तर तुलाही सांगेन,

दु:ख कस झिजवायच असत .

अश्रूंचा नवीन संसार करून

सुखाने कस नांदायच असत .

वेळ आली तर तुलाही सांगेन,

प्रेम कस करायच असत .


Share

Leave a comment