महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना 2024 | महिलांना भेटणार 1500 प्रति महिना | ladli behna yojana maharashtra

Share

महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना 2024 | महिलांना भेटणार 1500 प्रति महिना | ladli behna yojana maharashtra

महाराष्ट्र सरकारद्वारे नुकतेच नवीन घोषणा करण्यात आली , या नवीन योजनेचे नाव आहे माझी लाडकी बहीण योजना .

महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाणे 50 पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील
श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्के वारी 59.10 टक्के व स्त्रीयांची टक्के वारी 28.70 टक्के
इतकी आहे. ही वस्तुस्थिति लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितिमध्ये सुधारणा करणे
आवश्यक आहे.

महिलांचेआरोग्य व पोषण आहार त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना
राबहवण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळेत्यांच्या आर्थिक
स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिति लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक
स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक
भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू
करण्याचे प्रस्तावित आहे.

योजनेचा उद्देश

  • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे .
  • त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
  • राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळवणे .
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.

योजनेचे स्वरूप

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक
केलेल्या बँक खात्यात दर महिना 1500 इतकी रक्कम देण्यात येईल .

योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षे वयोगटातील विवाहित , विधवा , घटस्फोटित आणि निराधार महिला

योजनेमध्ये पात्र लाभार्थी

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी .
  • राज्यातील विवाहित , विधवा , घटस्फोटित आणि निराधार महिला .
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत .
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी याचे बँक खाते असणे आवश्यक आहे .
  • उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे .

योजनेमध्ये अपात्र

  • ज्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असणे .
  • ज्याच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर विभागामध्ये आहे .
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम , कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / भारत सरकार / केंद्र सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत .

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज .
  • लाभार्थ्याचे आधारकार्ड
  • मतदानकार्ड
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • बँक खाते
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • हमीपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया

योजनेचा अर्ज पोर्टल /मोबाईल अॅपद्वारे / सेतु सुविधा केंद्राद्वारे भरले जाऊ शकतात .

  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल .
  • ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल , त्याच्यासाठी ‘अर्ज’ भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (ग्रामपंचायत /वार्ड /सेतु सुविधा केंद्रे उपलब्ध असतील .
  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल .
  • अर्जदार व्यक्तीने स्वत: ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल .
अ . क्र उपक्रम वेळेची मर्यादा
1 अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024
2 अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024
3 तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024
4 तात्पुरत्या यादीवरील तक्रार प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024
5 तक्रारचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024
6 अंतिम यादी प्रकाशन करण्याचा दिनांक 01 ऑगस्ट 2024
7 लाभार्थ्याचे बँकेमध्ये E-KYC करणे . 10 ऑगस्ट 2024
8 लाभार्थी निधी हस्तांतरण14 ऑगस्ट 2024
9 त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत

लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली?

1 जुलै 2024

लाडकी बहीण योजना कोठे सुरू करण्यात आली ?

महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेचे अनुदान किती भेटणार आहे ?

1500 प्रती महिना


Share

Leave a comment