मानसशास्त्र म्हणजे काय ? Psychology in Marathi ?

Share

मानसशास्त्राला इंग्रजीत Psychology असा प्रतिशब्द असून तो ग्रीक भाषेतील Psyche म्हणजे आत्मा व Logos म्हणजे शास्त्र यापासून बनलेला आहे . त्यानुसार मानसशास्त्र म्हणजे आत्म्यासंबंधीचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते .

19 व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मानसशास्त्र हे आत्म्यासंबंधीचा अभ्यास करणारे तत्वज्ञानाचे एक अंग मानले जात होते .

19 व्या शतकातील शरीरशास्त्र व पदार्थविज्ञान यातील संशोधन व प्रगती मानसशास्त्राच्या विकासाला पोषक ठरली . वुण्डट याने 1879 मध्ये जर्मनी येथील लिपझीग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली . त्यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे शास्त्र होय .

मॉर्गन, किंग व रोबिन्सन यांच्या मते, मानसशास्त्र म्हणजे मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र होय. या शास्त्रातील मूलभूत तत्वांचे उपयोजन मानवी जीवनातील विविध समस्यांच्या बाबतीत केले आहे .

रॉबर्ट बॅरन यांच्या मते , मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास होय .(psychology is the science of behaviour and cognitive processes)

  • रॉबर्ट एस. फेल्डमन यांच्या मते अत्याधुनिक व्याख्या “मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास होय. ” मानसशास्त्र म्हणजे शास्त्रीय अभ्यास आहे काय ? हे ठरवण्यासाठी सर्वप्रथम शास्त्र म्हणजे काय हे पाहावे लागेल . शास्त्र म्हणजे कोणतीही सुव्यवस्थित ज्ञानरचना होय. कोणतीही ज्ञानशाखेस ‘ शास्त्र ‘ म्हणण्यासाठी तीन गोष्टींची जरूरी असते.
  1. वस्तुनिष्ठ दृष्टिकोण
  2. घटकांचे स्पष्टीकरण व सुव्यवस्थिकरण करून त्या आधारे सामान्य सिद्धांताचा शोध घेणे.
  3. वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणे . मानसशास्त्रात वर्तनाचे वास्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते व त्याबाबत सामान्य नियम प्रस्थापित केले जातात. त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणून मानसशास्त्र हा शास्त्रीय अभ्यास होय .

वर्तनाप्रमाणे मानसिक प्रक्रियांचाही मानसशास्त्रात अभ्यास केला जातो. व्यक्तीच्या प्रेरणा, भाव-भावना , इच्छा-आकांक्षप्रमाणेच विचार , तर्क , स्मरण , अध्ययन , निर्णयक्षमता इत्यादी मानसिक प्रक्रियांचा मानसशास्त्रात अभ्यास केला जातो.

मानसशास्त्रीय अभ्यासाची चार प्रमुख उद्दिष्टे

  • वर्तनाचे वर्णन : काय घडत आहे याचे निरीक्षण किंवा आकलन करणे हे मानसशास्त्राचे प्रथम उद्दिष्ट होय. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी व तिचे आकलन होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे त्या गोष्टीस नाव देणे किंवा काय घडते ते अभ्यासणे होय. वर्तनाचे निरीक्षण कारणे आणि त्यासंबंधीच्या सर्व गोष्टींची नोंद घेणे म्हणजे वर्तन होय.
  • वर्तनाचे स्पष्टीकरण : लोक असे का वागतात याविषयी कारणमीमांसा मानसशास्त्रात केली जाते. उपरोक्त उदाहरणतील मुलगा अशा प्रकारच्या गोष्टी का करतो, हे जाणून घेण्यासाठी शालेय समुपदेशकामार्फत त्याला चाचण्या देऊन शिक्षिक त्याच्या वर्तनसंबंधीच्या कारणांचा शोध घेऊ शकतात. त्याला काही शारीरिक आजार आहे काय याबाबत त्याचे पालक डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात . गरज असेल तर त्याला मानसोपचार तज्ञांकडे घेऊन गेले पाहिजे.
  • वर्तनाचे पूर्वकथन : एकदा वर्तनसंबंधीची करणे समजली , कारण-कार्यसंबंध प्रस्थापित झाली की, वर्तनासंबंधी पूर्वकथन करणे सोपे जाते . एखाद्या व्यक्तीचे कोणत्या वेळी, कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारचे वर्तन होईल याबाबत बऱ्याच अंशी निश्चित स्वरूपात पूर्वकथन करणे शक्य होते.
  • वर्तनाचे नियंत्रण : वर्तनाची कारणे समजून त्यासंबंधी पूर्वकथन करता आल्यामुळे इतर व्यक्तींच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. म्हणूनच वर्तनाचे नियंत्रण करणे हे मानसशास्त्राचे महत्वाचे उद्दिष्टे होय.

Share

Leave a comment