मानसोपचार म्हणजे काय ? त्याचा वापर कोण करू शकतो ? Psychotherapy – What is it ? who uses it ?

Share

मानसोपचार म्हणजे काय ? ( Psychotherapy )

मानसोपचार ( Psychotherapy) म्हणजे मानवी वर्तनात होणाऱ्या बिघाडांमुळे किंवा मानसिक आजार बंद करण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रगत शास्त्र आहे . समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी शारीरिक रोगाशी सामना करावा लागतो . पण काही व्यक्तींना मानसिक आजाराशी तोंड द्यावे लागते . शारीरिक आजारपण आणि औषधोपचार या गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत . शरीरीक आजाराकडे लोक जागरुकतेने पाहतात . परंतु मानसिक आजाराकडे इतकी सहजपणे पाहवायस मिळत नाही .

मानसिक आजारपण आणि मानसिक रुग्ण यामध्ये फरक करायला हवा . नेहमीच्या दैनंदिन जीवनात कळत – नकळत अचानकपणे आपल्याकडून असे काही वर्तन घडते की त्या दिवसभराची घडी विस्कटून जाते . असे घडणे म्हणजे मानसिक रुग्ण नव्हे . समाजविघातक वर्तन , मानसिक आजारपण आणि मानसिक विकृती या वर्तनाच्या विविध पातळ्या आहेत . एखादी घटना विक्षिप्तपणे घडली म्हणजे ती व्यक्ती मनोरुग्ण झाली असे म्हणता येणार नाही .

व्याख्या ( Definition of Psychotherapy )

“मानसोपचार ही मदतीची प्रक्रिया असून यामध्ये प्रशिक्षित उपचारक ( Therapist ) खात्रीपूर्वक आणि सुलभतेने मनोरुग्णांच्या ( client ) अभिवृत्ती आणि वर्तनामध्ये बदल करू शकतो . “

पूर्वी मनोरुग्णांना विकृत व्यक्ती असे संबोधले जायचे . परंतु जागतिक मानवी हक्क समिती आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी विकृत व्यक्तींना रुग्ण म्हणजे client असा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली आहे .

  • मानसिक आरोग्य समस्याग्रस्त असलेल्या फक्त निम्म्या बालकांनाच उपचार मिळतो .
  • मानसिक आरोग्य समस्येसाठी सर्वात प्रचलित उपचार म्हणजे फक्त औषध घेणे हा आहे .
man and woman near table

प्रौढावस्थेतील लिंगभिन्नता ( Gender Difference in Adulthood )

स्त्री आणि पुरुष या सामाजिक भिन्नतेमुळे पुरुषांपेक्षा स्त्रिया स्वत:च्या भावना स्वत:मधील चुका व्यक्त करून त्यातून बरे होतात . याशिवाय समाजाची अशीही अपेक्षा असते की पुरुष हे सशक्त स्वतंत्र , कठीण परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असतात. ज्या देशामध्ये आर्थिक प्रगती झाली आहे त्या देशातील स्त्री – पुरुषांपेक्षा गरीबी आणि निम्न आर्थिक दर्जा असणाऱ्या देशातील स्त्री – पुरुष मानसिक आरोग्य सेवा घेण्यात मागे असतात .

बालकांवरील उपचार ( Treatment of Children )

बाल्यावस्थेमध्येदेखील मानसोपचार घेण्यात लिंगभिन्नता दिसून येते . बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यांची तुलना केल्यास मुलींपेक्षा मुलांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे .


Share

Leave a comment