रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे म्हणजे काय ? त्यांचे परिणाम | What is Menopause ?

Share

रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे म्हणजे काय ? त्यांचे परिणाम | What is Menopause ?

रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे ही जैविक घटना आहे . रजोनिवृत्ती हा स्त्री शरीराच्या निसर्गचक्राचा एक भाग आहे . सर्व स्त्रियांना या निसर्गचक्राला सामोरे जावे लागते . स्त्रीच्या लैंगिक जीवनातील किंवा लैंगिकतेविषयी सर्वात महत्वाचे असे परिवर्तन म्हणजे ऋतुस्त्राव बंद होणे होयी . स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या 12 ते 14 वर्षाच्या दरम्यान चालू होते आणि सुमारे 45 ते 50 व्या वर्षी ती बंद होते . ही दोन्ही परिवर्तने अगदी नैसर्गिक असतात . प्रत्येक स्त्रीला या अवस्थेतून जावे लागते . मासिक पाळी बंद झाल्याने मुले होण्याची क्षमता संपते . ऋतुस्त्राव बंद होण्याच्या सुमारास काही सर्वसाधारण शारीरिक व मानसिक बदल होतात . सर्वसाधरणपणे स्त्रीच्या वयाच्या 49 व्या वर्षी मासिक पाळी बंद होते . पण या बाबतीत स्त्रियांमध्ये व्यक्तिभिन्नता दिसते . स्त्रीचे आरोग्य , वय , अनुवंश , हवामानातील भिन्नता व बाह्य वातावरण यावर मासिक पाळी बंद होण्याचा काल अवलंबून असतो . पाश्चात्य देशातील स्त्रियांच्या बाबतीत असे आढळून आले आहे की , अतिरिक्त धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी लवकर बंद होते . सर्वसाधारणपणे स्त्रीच्या शेवटच्या मासिक पाळीनंतर एक वर्षाचा कालावधी उलटल्यावर मासिक पाळी बंद झाली असे मानले जाते . म्हणजेच संपूर्ण वर्षभर जर मासिक पाळी आली नाही तर ऋतुस्त्राव बंद झाला व रजोनिवृत्ती झाले असे समजण्यास हरकत नाही . काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीतील हे बदल व ऋतुस्त्राव बंद होणे या गोष्टी वयाच्या 30 व्या वर्षीच अनुभवास येतात . तर काहींच्या बाबतीत वयाच्या 60 व्या वर्षीसुद्धा मासिक पाळी बंद झालेली नसते . ज्या मुली लवकर वयात येतात आणि लवकर लैंगिक परिपक्वता प्राप्त करतात . त्यांची मासिक पाळी उशिरा बंद होते . आणि ज्या मुली उशिरा वयात येतात त्यांची मासिक पाळी लवकर बंद होते .

woman in red and green zip up jacket wearing eyeglasses

रजोनिवृत्तीचे शारीरिक परिणाम

मासिक पाळी बंद होण्याच्या काळात सुमारे 40 ते 50 वर्षे या वयादरम्यान रजोनिवृत्तीच्या आधी 2 ते 5 वर्षे स्त्रीच्या शरीरांतर्गत अनेक स्वरूपाचे बदल घडून येतात . त्यातून ऋतुस्त्राव बंद होण्याची अवस्था येते . यालाच कामक्षीणन कालावधी असे म्हणतात .या काळात जननक्षमतेशी संबंधित अवयवांचे कार्य हळूहळू मंदावते . अंडग्रंथीचे कार्य मंदावते . अंत:स्त्रावी ग्रंथीमधून निर्माण होणारे स्त्राव कमी प्रमाणात निर्माण होतो . त्यामुळे स्त्री-बीज निर्माण करणाऱ्या ग्रंथीचे कार्य थांबते . एस्ट्रोजनच्या अभावामुळे व काही अशी परिस्थितीजन्य अशा ताणामुळे या काळात स्त्रीच्या शरीरात काही बदल होतात . ते खालीलप्रमाणे –

  • काही स्त्रियांची मासिक पाळी अचानक बंद होते . काहींची पाळी नियमित होते पान रक्त जाण्याचे प्रमाण कमी होते . त्यानंतर ऋतुस्त्राव अनियमितपणे होऊ लागतो व मासिक पाळीचा कालावधी हळूहळू लांबत जातो .
  • पुनरुत्पादन संस्थेच्या इंद्रियांचे कार्य थांबत्ते . योनीमार्गाचा व पुनरुत्पादन यंत्रणेचा ऱ्हास झाल्याने परिपक्व अंडपेशी किंवा लैंगिक अंत:स्त्राव निर्माण होत नाही .
  • लैंगिक स्त्रावांच्या कमतरतेमुळे स्त्रीत्व निर्माण करणाऱ्या लक्षणात घट होते . दुय्यम लैंगिक गुणवैशिष्ट्य कमी दिसू लागतात . स्त्रियांच्या चेहऱ्यावरील केस राठ बनतात . आवाजात बदल होतो . स्तनांचा घट्टपणा कमी होऊन त्यात सैलपणा येतो . जननेंद्रियावरील व काखेतील केस विरळ होतात . अवयवांचा गोलाकार कमी होतो व शरीर लठ्ठ होते .
  • रजोनिवृत्तीच्या काळात शारीरिक अस्वस्थता व शारीरिक वेदना अधिक जाणवतात . रात्री घाम फुटणे , डोके दुखणे , थकवा , भीती वाटणे , उदासीनता , हृदयाची धडधड होणे इत्यादी शारीरिक अवस्थता दर्शविणारी लक्षणे आढळतात .
  • बऱ्याच वेळा मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रियांचे वजन वाढते . पोटाजवळचा भाग व पार्श्वभागात चरबीचे प्रमाण वाढते . स्त्रिया अधिक जाड दिसतात .
  • हाताच्या बोटांचे सांधे दुखू लागतात व बोटे सुजल्यासारखी दिसतात .
  • बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी बंद झाल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बदल दिसून येतो . स्त्रिया अधिक उदास , खिन्न , चिडचिड्या व रागीट बनतात . त्यांची वृत्ती अतिशय चंचल बनते .
  • मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रियांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात . घाम येऊन नंतर लगेच शरीर गरम होणे , ताप येऊन संपूर्ण शरीरास झिणझिणल्यासारखे वाटते . तसेच एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे हाडे अधिक ठिसूळ व पातळ बनतात .

Share

Leave a comment