सर्वनाम व त्याचे प्रकार| मराठी व्याकरण | Sarvanam in marathi |

Share

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात . नमांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय . सर्वनामांना स्वत:चा अर्थ नसतो . ती ज्या नामासाठी वापरली जातात , त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो .

pink clouds

सर्वनामांचे खालील सहा प्रकार पडतात

  1. पुरुषवाचक 1
  2. दर्शक
  3. संबंधी
  4. प्रश्नार्थक
  5. सामान्य/अनिश्चित
  6. आत्मवाचक

सर्वनामाची वैशिष्ठ्ये :

  • सर्वनाम ही विकारी शब्दजाती आहे .
  • सर्वनामांना लिंग , वचन , विभक्ती असे विकार होतात .
  • सर्वनामांना स्वत:चा अर्थ नाही .
  • सर्वनामांना प्रतिनामे असेसुद्धा म्हणतात .
  • अधिक वाचा मराठी नाम व नामाचे प्रकार | Noun in Marathi Grammar| Nam in Marathi

मराठीत एकूण सर्वनामे खालीलप्रमाणे 9 आहेत .

  • मी . कोण
  • तू . आपण
  • तो/ती/त्या/ते . काय
  • हा /ही/हे/ह्या . स्वत:
  • जो/जी/जे/ज्या

1) पुरुषवाचक सर्वनामे :

व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे . प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत . फक्त तृतीय सर्वनामे मात्र बदलतात .

अ) प्रथम पुरुषवाचक :

बोलणारा स्वत:चा उल्लेख करताना स्वत:च्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो , ती प्रथम पुरुषवाचक असतात .

उदा . मी , आम्ही , आपण , स्वत:

ब) द्वितीय पुरुषवाचक :

समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात , ती द्वितीय पुरुष वाचक असतात .

उदा . तू , तुम्ही , आपण , स्वत:

क) तृतीय पुरुषवाचक :

ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे , त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषी सर्वनामे म्हणतात . अशी व्यक्ती शक्यतो समोर नसते .

उदा . तो , ती , ते , त्या .

2) दर्शक सर्वनाम :

हा/ ही/ हे/ह्या/तो/ती/ते/त्या + विशेषण + नाम = दर्शक सर्वनाम

हा/ ही/ हे/ह्या/तो/ती/ते/त्या +नाम + विशेषण = दर्शक विशेषण

दर्शक सर्वनाम दर्शक विशेषण
1) ती चलाख मुलगी आहे . 1) ती मुलगी चलाख आहे .
2) तो मठ्ठ मुलगा आहे . 2) तो मुलगा मठ्ठ आहे .
3) तो गोरा मुलगा आहे .3) तो मुलगा गोरा आहे .
4) हा रानटी हत्ती आहे .4) हा हत्ती रानटी आहे .

3) संबंधी सर्वनामे :

जो , जी , जे , ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत .

उदा .

  • जे चकाकते , ते सोने नसते .
  • जो करेल , तो भरेल .
  • ज्याने हे भांडण उकरले , तो माघार घेईल .
  • जे पेरावे , ते उगवते .

4) प्रश्नार्थक सर्वनामे :

एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात .

उदा . कोण, काय , कोणास , कोणाला , कोणी .

5) सामान्य/अनिश्चित सर्वनामे :

कोण / काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर ती अनिश्चित सर्वनामे असतात .

6 ) आत्मवाचक सर्वनामे :

आत्मवाचक सर्वनामे वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाहीत , कारण ती स्वत: असा अर्थ व्यक्त करत असल्यामुळे ती नेहमी नामानंतरच वापरावे लागतात . तीन आत्मवाचक सर्वनामांपैकी निज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे , तर स्वत: / आपण ही पुरुषवाचक शब्दाची जात विचारल्यास पुरुषवाचक सांगावी तर स्वत: शब्दाची मात्र आत्मवाचक सांगावी .

  • कर्ता आपण / स्वत: / निज ( आत्मवाचक )

उदा .

  1. मी स्वत: त्याला पाहिले .
  2. तो आपणहून माझ्याकडे आला .
  3. तू स्वत: मोटार हाकशील का ?
  4. पक्षी निज बाळांसह बागडती .
  5. अधिक वाचा ChatGpt म्हणजे काय? What is ChatGpt in Marathi?

सर्वनामोत्पन्न सर्वनामे :

मूळ सर्वनामांना प्रत्यय जोडून सर्वनामांची जी विविध रुपे तयार केली जातात त्यांना सर्वनामोत्पन्न सर्वनामे म्हणतात .

  • हा – असा , असला , इतका , एवढा
  • तो – तसा , तसला , तितका , तेवढा

मराठीत एकूण किती सर्वनामे आहेत ?

मराठीत एकूण 9 सर्वनामे आहेत

सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?

सर्वनामाचे 6 प्रकार पडतात ?

सर्वनामाचे कोणते प्रकार पडतात ?

1) पुरुषवाचक सर्वनामे , 2) दर्शक सर्वनाम , 3) संबंधी सर्वनामे , 4) प्रश्नार्थक सर्वनामे , 5) सामान्य/अनिश्चित सर्वनामे , 6 ) आत्मवाचक सर्वनामे


Share

Leave a comment