Skip to content
- शाळा हे समाजाने , समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे .
- चारित्र्याचा विकास घडविते , तेच खरे शिक्षण .
- नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे .
- शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय .
- बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने फुलवीत असतात तेच गुरु .
- ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतिचा पाया आहे .
- प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते .
- स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे .
- विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे .
- घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही, जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर होय .
- जेथे आळशी आरामात आहे , तेथे राम नाही .
- विदयेवाचून मान नाही , विदयेवाचून द्रव्य नाही आणि विदयेवाचून मनुष्यपण ही नाही .
- मुले म्हणजे नवजगाची आशा- उद्याचे जग बनवणारी थोर शक्ती म्हणजे मुले . – साने गुरुजी
- झोपताना दिवसाचा आढावा घ्या .
- मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करीत नाहीत.
- चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा .
- बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेल्या बरा .
- कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे .
- बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले | – संत तुकाराम
- जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण .
- कला अशी पाहिजे की , जी लाखों लोकांशी बोलू शकेल .
- आपल्या दु:खाचे कारण कोणतेही असले , तरी दुसऱ्याला इजा करू नका .
- अधिक मित्र हवे असतील , तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा .
- अनुभव हा महान शिक्षक आहे , पण मोबदला मात्र फार घेतो .
- आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात .
- अविचाराने आत्मघात होतो .
- आशा ही निराशेची छोटी बहीण आहे .
- अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो .
- आपण केलेल्या परीक्षा आणि आपली घड्याळे नेहमीच बदलत असतात .
- एकदा बोललेले खोटे लपवण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते , म्हणून खोटे बोलू नये .
- गुलाबाल काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काठयाला गुलाब असतो , याचे सुख माना .
- गरीब स्थितील समाधान हे खऱ्या श्रीमंतांचे लक्षण आहे .
- गरिबांना दु;ख अनुभवाने कळते , पण श्रीमंताना ते बुद्धीने जाणून घ्यावे लागते .
- गेलेल्या संधिबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा .
- चित्र ही हाताची कृती आहे , पण चरित्र ही मनाची कृती आहे .
- संकटे पाहून जो घाबरत नाही , तोच खरा माणूस होय .
- सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे , हा योगा-योग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे , ही आयुष्य भराची कमाई आहे .
- हास्य हे जीवन वृक्षाचे फूल आहे , परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे .
- संयम हा सोन्याचा लगाम आहे , त्याने पशूच माणूस आणि माणसाचा देव होतो .
- स्वत:ला लपविण्याचा एकच मार्ग आहे आणितो दुसऱ्यावर टिका करणे होय .
- स्वत:च्या बाबतीत स्वत: कधीच न्यायाधीश बनू नका .
- सौंदर्य हे वस्तूत नसून पहाणाऱ्याच्या दृष्टीत असते .
- समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात .
- संकटाना भिऊ नका , संकटाना संधि मानून त्यावर मात करा .
- संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे .
- श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा , तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल .
- शरीराला जसा व्यायाम , तसे मनाला वाचन .
- वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या , विशाल भूर्जपत्रावर लिहिलेले काव्य होत .
- विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे , याचेच नाव खरे शिक्षण .
- विजय हा मागून मिळत नसतो , तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो .
- वचन देताना विलंब करा , पण पाळताना घाई करा .
- ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही .
- धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते .
- धैर्य हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते .
- ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका .
- नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ .
- परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा .
- पैसा बोलू लागतो , तेव्हा सत्य गप्प बसते .
- जशी रत्ने बाहेरून चमक दाखवितात , तशी पुस्तके ही आतून अंत:करण उजळतात .
- पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत .
- विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.
- पुस्तक म्हणजे खिशातील बाग .
- ध्येयाचे सुप व्यवहाराच्या शेणाने सारवावे लागते .
- सारी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही .
- पैशाचा प्रश्न आला की , सर्वजण एकाच धर्माचे होतात .
- प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे , तर गती हा त्याचा आत्मा आहे .
- प्रयत्न हा परमेश्वर .
- प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक .
- रिकामे घर कुविचाराचे धन .
- भक्त कर्माची उपासना करतो , तर कर्मठ उपासनेचे कर्म करतो .
- मन सत्याने शुद्ध होते .
- विश्वासामुळे माणसाला बळ येते .
- जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही , मृत्यूलाही भीत नाही ,तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो .
- अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका .
- दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून दुर्बल राहू नका .
- जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो ,तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते .
- वाचनासाठी वेळ काढा , तो शहानपणाचा निर्झर आहे .
- मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो .
- जसा गेलेला बाण परत येत नाही ,तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही .
- टीका आणि विरोध हीच समाज सुधारकास मिळालेली बक्षिसे आहेत .
- देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत .
- विजय हाच शौर्याचा अलंकार आहे .
- विद्या विनयेन शोभते .
- विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे .
- गरज ही शोधाची जननी आहे.
- स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो .
- देशाचा विकास करायचा असेल तर, बालकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे .
- आळस आणि अतिझोप हे दारिद्रयाला जन्म देतात .
- माणुसकी हेच सर्वधर्माचे सार आहे .
- जो आईची पूजा करतो , त्याची जगपूजा करते .
- मौन हा रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आहे .
- आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे .
- इच्छा असेल तर मार्ग सुचतो .
- धोरण बदलू शकता , पण चरित्र बदलू शकत नाही .
- शास्त्र हे असे शस्त्र आहे की , याच्या सहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे .
- व्यक्तिगत चारित्रयातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते . – कॉलवर्ट
- जसे उकाड्याने दूध नासते , तसे क्रोधाने स्नेह नासतो .
- योग्य आणि अयोग्य याची परिक्षा करण्याचे खरे साधन म्हणजे यश होय .
- लीन असावे पण दीन असू नये .
- कमी अपेक्षा ही अपयशापेक्षाही मोठा गुन्हा आहे .
- धडपड हेच मानवाचे भाग्य आहे .
- चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा .
- जो जीवनाच्या सुखावर चालतो , त्याला कधीही थकवा येत नाही .
- धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो .
- सर्व गुणात महत्वाचा गुण म्हणजे तळमळ होय .
- जे दुसऱ्यासाठी जगतो , त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.
- जो पायांचा आवाज न करता चालतो , तो खूप दूरवर चालतो
- ज्ञान हे शान वाढविते तर , अज्ञान हे घाणीत सडविते .
- गरिबाची सेवा हीच ईश्वर सेवा होय .
- जो दुसऱ्यांना ओळखतो तो शिक्षित समजावा पण जो स्वत:ला ओळखतो तो खरा बुद्धिमान .