100+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani in Marathi.

Share

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ .

  • अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो .
  • आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पाहणे , नंतर देवधर्म करणे .
  • असतील शिते तर जमतील भुते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला , की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात .
  • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो .
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी – एखाद्या बुद्धिमान मानसालादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख , दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते .
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो , त्याचे मुळीच काम होत नाही .
  • अन्नछत्री जेवणे , वर मिरपूड मागणे – दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची , त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे .
  • अंगाला सुटली खाज , हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते .
  • अंगावरचे लेणे , जन्मभर देणे – दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे .
  • अंधारात केले , पण उजेडात आले – कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच .
  • अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे – नाव मोठे लक्षण खोटे .
  • अति झाले अन् आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ती दु:खदायी ठरते .
  • अति परिचयात अवज्ञा – जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो .
  • आईची माया अन् पोर जाईल वाया – फार लाड केले तर मुले बिघडतात .
  • आपलेच दात आणि आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते .
  • आयत्या बिळावर नागोबा – एखाद्याने स्वत:करिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे .
  • Read – ChatGpt म्हणजे काय? What is ChatGpt in Marathi? click here
  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे .
  • आपला हात जगन्नाथ – आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते .
  • अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? – कोणत्याही गोष्टीला ठरावीक मर्यादा असते .
  • अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती .
  • अति खाणे मसनात जाणे – अति खाणे नुकसानकारक असते .
  • अंथरूण पाहून पाय पसरावे – आपली ऐपत , वकूब पाहून वागावे .
  • अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे .
  • आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे – स्वत:च्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे .
  • आपली पाठ आपणास दिसत नाही – स्वत:चे दोष स्वत:ला दिसत नाही .
  • आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता , त्याच वेळी फायद्याची गोष्ट होणे .
  • आत्याबाईला जर मिशा असत्या तर – नेहमी एखाद्या कामात जर-तर या शक्यतांचा विचार करणे .
  • आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे .
  • आलिया भोगासी असावे सादर – तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे .
  • आवळा देऊन कोहळा काढणे – आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे .
  • आधीच तारे , त्यात गेले वारे – विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे .
  • Readमानसशास्त्र म्हणजे काय ? Psychology in Marathi ? click here
  • इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिति निर्माण होणे .
  • इच्छी परा ते येई घरा – आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे .
  • इन मिन साडेतीन – एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे .
  • उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो .
  • उंदराला मांजर साक्ष – ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे .
  • उचलली जीभ लावली टाळ्याला – दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे .
  • उथवळा नवरा गुढग्याला बाशिंग – अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे .
  • उठता लाथ बसता बुक्की – प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे .
  • उकराल माती तर पिकतील मोती – मशागत केल्यास चांगले पीक येते .
  • उडाला तर कावळा , बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते .
  • उधारीचे पोते , सव्वा हात रिते – उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो .
  • उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे – श्रीमंती आली की , तिच्या मागोमाग हाजी -हाजी करणारेही येतातच .
  • ऊसाच्या पोटी कापूस – सद्गुण माणसाच्या पोटी दुर्गणी संतती .
  • एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे .
  • एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही .
  • एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था .
  • एकावे जनाचे करावे मनाचे – लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे .
  • एका खांबावर द्वारका – एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे .
  • एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला – एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे .
  • ओळखीचा चोर जीवे न सोडी – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो .
  • Read 100+ सर्वश्रेष्ठ सुविचार | Marathi Suvichar Click here
  • औटघटकेचे राज्ये – अल्पकाळ टिकणारी गोष्ट .
  • करावे तसे भरावे – जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे .
  • करून करून भागला , देवध्यानी लागला – भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पूजेला लागणे .
  • कधी तुपाशी तर कधी उपाशी – सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही .
  • कशात काय नि फाटक्यात पाय – वाइटात आणखी वाईट घडणे .
  • काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही – रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही .
  • काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती – क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढयापुरताच असतो .
  • कानात बुगडी , गावात फुगडी – आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे .
  • काल मेला आणि आज पितर झाला – अतिशय उतावळेपणाची वृत्ती .
  • कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते – पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे .
  • कानामागून आली अन् तिखट झाली – श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे .
  • कामापुरता मामा – आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे .
  • कावळा अन् आणि फांदी तुटली – परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे .
  • काप गेले नि भोके राहिली – वैभव गेले अन् फक्त त्याच्या खुणा राहिल्या .
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते .
  • काळ आला पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे .
  • कांदा पडला पेवात , पिसा हिंडे गावात – चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे .
  • कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही .
  • कुडी तशी फोडी – देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे .
  • खऱ्याला मरण नाही – खरे कधीच लपत नाही.
  • Read –2023 मध्ये ब्लॉग कसा तयार करायचा? How To Start Blog in Marathi? click here
  • खाण तशी माती – आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे .
  • खायला काळ भुईला भार – निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो .
  • खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते .
  • खाऊन माजावे टाकून माजू नये – पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये .
  • खोट्याच्या कपाळी गोटा – खोटेपणा , वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते .
  • ग ची बाधा होणे – गर्व चढणे .
  • गरजेल तो पडल काय- केवळ बदबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही .
  • गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते .
  • गळ्यातले तुटले ओटीत पडले – नुकसान होता – होता टळणे .
  • गाड्याबरोबर नळयाची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहनांचाही फायदा होणे .
  • घरोघरी मातीच्याच चुली – एखाद्या बाबतीत सामन्यात: सर्वत्र सारखीच परिस्थिति असणे .
  • घर ना दार देवळी बिऱ्हाड – शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती .
  • चोरावर मोर – एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे ..
  • चालत्या गाडीला खीळ – व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे .
  • दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसातदेखील दोष असतो .
  • देश तसा वेश – परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन .
  • दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते .
  • दहा गेले , पाच उरले – आयुष्य कमी उरले .
  • नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे .
  • बाप तैसा बेटा – बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे .

1)बाप से बेटा सवाई .

अर्थ – वाडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार .

2)पळसला पाने तीनच .

अर्थ – कोठेही गेले तरी परिस्थिति सामन्यात: सारखीच असते .

3)उंटावरचा शहाणा .

अर्थ – मूर्खासारखा सल्ला देणारा .


Share

Leave a comment