100+ सर्वश्रेष्ठ सुविचार | Marathi Suvichar

Share

  1. शाळा हे समाजाने , समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे .
  2. चारित्र्याचा विकास घडविते , तेच खरे शिक्षण .
  3. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे .
  4. शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय .
  5. बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने फुलवीत असतात तेच गुरु .
  6. ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतिचा पाया आहे .
  7. प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते .
  8. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे .
  9. विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे .
  10. घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही, जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर होय .
  11. जेथे आळशी आरामात आहे , तेथे राम नाही .
  12. विदयेवाचून मान नाही , विदयेवाचून द्रव्य नाही आणि विदयेवाचून मनुष्यपण ही नाही .
  13. मुले म्हणजे नवजगाची आशा- उद्याचे जग बनवणारी थोर शक्ती म्हणजे मुले . – साने गुरुजी
  14. झोपताना दिवसाचा आढावा घ्या .
  15. मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करीत नाहीत.
  16. चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा .
  17. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेल्या बरा .
  18. कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे .
  19. बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले | – संत तुकाराम
  20. जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण .
  21. कला अशी पाहिजे की , जी लाखों लोकांशी बोलू शकेल .
  22. आपल्या दु:खाचे कारण कोणतेही असले , तरी दुसऱ्याला इजा करू नका .
  23. अधिक मित्र हवे असतील , तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा .
  24. अनुभव हा महान शिक्षक आहे , पण मोबदला मात्र फार घेतो .
  25. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात .
  26. अविचाराने आत्मघात होतो .
  27. आशा ही निराशेची छोटी बहीण आहे .
  28. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो .
  29. आपण केलेल्या परीक्षा आणि आपली घड्याळे नेहमीच बदलत असतात .
  30. एकदा बोललेले खोटे लपवण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते , म्हणून खोटे बोलू नये .
  31. गुलाबाल काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काठयाला गुलाब असतो , याचे सुख माना .
  32. गरीब स्थितील समाधान हे खऱ्या श्रीमंतांचे लक्षण आहे .
  33. गरिबांना दु;ख अनुभवाने कळते , पण श्रीमंताना ते बुद्धीने जाणून घ्यावे लागते .
  34. गेलेल्या संधिबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा .
  35. चित्र ही हाताची कृती आहे , पण चरित्र ही मनाची कृती आहे .
  36. संकटे पाहून जो घाबरत नाही , तोच खरा माणूस होय .
  37. सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे , हा योगा-योग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे , ही आयुष्य भराची कमाई आहे .
  38. हास्य हे जीवन वृक्षाचे फूल आहे , परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे .
  39. संयम हा सोन्याचा लगाम आहे , त्याने पशूच माणूस आणि माणसाचा देव होतो .
  40. स्वत:ला लपविण्याचा एकच मार्ग आहे आणितो दुसऱ्यावर टिका करणे होय .
  41. स्वत:च्या बाबतीत स्वत: कधीच न्यायाधीश बनू नका .
  42. सौंदर्य हे वस्तूत नसून पहाणाऱ्याच्या दृष्टीत असते .
  43. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात .
  44. संकटाना भिऊ नका , संकटाना संधि मानून त्यावर मात करा .
  45. संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे .
  46. श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा , तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल .
  47. शरीराला जसा व्यायाम , तसे मनाला वाचन .
  48. वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या , विशाल भूर्जपत्रावर लिहिलेले काव्य होत .
  49. विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे , याचेच नाव खरे शिक्षण .
  50. विजय हा मागून मिळत नसतो , तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो .
  51. वचन देताना विलंब करा , पण पाळताना घाई करा .
  52. ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही .
  53. धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते .
  54. धैर्य हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते .
  55. ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका .
  56. नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ .
  57. परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा .
  58. पैसा बोलू लागतो , तेव्हा सत्य गप्प बसते .
  59. जशी रत्ने बाहेरून चमक दाखवितात , तशी पुस्तके ही आतून अंत:करण उजळतात .
  60. पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत .
  61. विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.
  62. पुस्तक म्हणजे खिशातील बाग .
  63. ध्येयाचे सुप व्यवहाराच्या शेणाने सारवावे लागते .
  64. सारी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही .
  65. पैशाचा प्रश्न आला की , सर्वजण एकाच धर्माचे होतात .
  66. प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे , तर गती हा त्याचा आत्मा आहे .
  67. प्रयत्न हा परमेश्वर .
  68. प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक .
  69. रिकामे घर कुविचाराचे धन .
  70. भक्त कर्माची उपासना करतो , तर कर्मठ उपासनेचे कर्म करतो .
  71. मन सत्याने शुद्ध होते .
  72. विश्वासामुळे माणसाला बळ येते .
  73. जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही , मृत्यूलाही भीत नाही ,तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो .
  74. अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका .
  75. दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून दुर्बल राहू नका .
  76. जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो ,तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते .
  77. वाचनासाठी वेळ काढा , तो शहानपणाचा निर्झर आहे .
  78. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो .
  79. जसा गेलेला बाण परत येत नाही ,तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही .
  80. टीका आणि विरोध हीच समाज सुधारकास मिळालेली बक्षिसे आहेत .
  81. देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत .
  82. विजय हाच शौर्याचा अलंकार आहे .
  83. विद्या विनयेन शोभते .
  84. विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे .
  85. गरज ही शोधाची जननी आहे.
  86. स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो .
  87. देशाचा विकास करायचा असेल तर, बालकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे .
  88. आळस आणि अतिझोप हे दारिद्रयाला जन्म देतात .
  89. माणुसकी हेच सर्वधर्माचे सार आहे .
  90. जो आईची पूजा करतो , त्याची जगपूजा करते .
  91. मौन हा रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आहे .
  92. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे .
  93. इच्छा असेल तर मार्ग सुचतो .
  94. धोरण बदलू शकता , पण चरित्र बदलू शकत नाही .
  95. शास्त्र हे असे शस्त्र आहे की , याच्या सहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे .
  96. व्यक्तिगत चारित्रयातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते . – कॉलवर्ट
  97. जसे उकाड्याने दूध नासते , तसे क्रोधाने स्नेह नासतो .
  98. योग्य आणि अयोग्य याची परिक्षा करण्याचे खरे साधन म्हणजे यश होय .
  99. लीन असावे पण दीन असू नये .
  100. कमी अपेक्षा ही अपयशापेक्षाही मोठा गुन्हा आहे .
  101. धडपड हेच मानवाचे भाग्य आहे .
  102. चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा .
  103. जो जीवनाच्या सुखावर चालतो , त्याला कधीही थकवा येत नाही .
  104. धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो .
  105. सर्व गुणात महत्वाचा गुण म्हणजे तळमळ होय .
  106. जे दुसऱ्यासाठी जगतो , त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.
  107. जो पायांचा आवाज न करता चालतो , तो खूप दूरवर चालतो
  108. ज्ञान हे शान वाढविते तर , अज्ञान हे घाणीत सडविते .
  109. गरिबाची सेवा हीच ईश्वर सेवा होय .
  110. जो दुसऱ्यांना ओळखतो तो शिक्षित समजावा पण जो स्वत:ला ओळखतो तो खरा बुद्धिमान .


Share

Leave a comment