वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ :
होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात .
- भान नसणे – जाणीव नसणे .
- सर्वस्व पणाला लावणे – सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे .
- साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे .
- सामोरे जाणे – निधड्या छातीने संकटास तोंड देणे .
- साक्षर होणे – लिहिता – वाचता येणे .
- सुतोवाच करणे – पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे .
- सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे .
- स्वप्न भंगणे – मनातील विचार कृतीत न येणे .
- स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने , गर्वाने अतिशय फुगणे .
- हट्टाला पेटणे – मुळीच हट्ट न सोडणे .
- Read – 100+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani in Marathi. click here
- हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे .
- हरभऱ्याच्या झाडावर चढवणे – खोटी स्तुती करून मोठेपणा देणे .
- हसता हसता पुरेवाट होणे – अनावर हसू येणे .
- हस्तगत करणे – ताब्यात घेणे .
- हातपाय गळणे – धीर सुटणे .
- हातचा मळ असणे – सहज शक्य असणे .
- हात ओला होणे – फायदा होणे .
- हात टेकणे – नाइलाज झाल्याने माघार घेणे .
- हात देणे – मदत करणे .
- हात मारणे – भरपूर खाणे .
- हाय खाणे – धास्ती घेणे .
- हातवार तुरी देणे – डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे .
- हात हलवत परत येणे – काम न होता परत येणे .
- हात झाडून मोकळे होणे – जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे .
- हातापाया पडणे – गयावया करणे .
- हातात कंकण बांधणे – प्रतिज्ञा करणे .
- हूल देणे – चकवणे .
- प्रश्नांची सरबत्ती करणे – एकसारखे प्रश्न विचारणे .
- प्राणावर उदार होणे – जिवाची पर्वा न करणे .
- फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे .
- Read – मानसशास्त्र म्हणजे काय ? Psychology in Marathi ? click here
- फुटाण्यासारखे उडणे – झटकन राग येणे .
- बारा वाजणे – पूर्ण नाश होणे .
- बत्तिशी रंगवणे – जोराने थोबाडात मारणे .
- बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे .
- बेत हाणून पाडणे – बेत सिद्धीला जाऊ न देणे .
- बोल लावणे – दोष देणे .
- बोळयाने दूध पिणे – बुद्धीहीन असणे .
- भगीरथ प्रयत्न करणे – चिकाटीने प्रयत्न करणे .
- भारून टाकणे – पूर्णपणे मोहून टाकणे .
- मान ताठ ठेवणे – स्वाभिमानाने वागणे .
- माशा मारणे – कोणताही उद्योग न करणे .
- मिशीवर ताव मारणे – बढाई मारणे .
- मूग गिळणे – उत्तर न देता गप्प राहणे .
- मधाचे बोट लावणे – आशा दाखवणे .
- मनात घर करणे – मनात कायमचे राहणे .
- मशागत करणे – मेहनत करून निगा राखणे .
- रक्ताचे पाणी करणे – अतिशय मेहनत करणे .
- राख होणे – पूर्णपणे नष्ट होणे .
- राब राब राबणे – सतत खूप मेहनत करणे .
- राम नसणे – अर्थ नसणे .
- Read – ChatGpt म्हणजे काय? What is ChatGpt in Marathi? click here
- राम म्हणणे – मृत्यू येणे .
- वकीलपत्र घेणे – एखाद्याची बाजू घेणे .
- वाट लावणे – विल्हेवाट लावणे .
- वठणीवर आणणे – ताळ्यावर आणणे .
- वाचा बसणे – एक शब्दही बोलता न येणे .
- वेड घेऊन पेडगावला जाणे – मुद्दाम डोंग करणे .
- शिगेला पोचणे – शेवटच्या टोकाला जाणे .
- शंभर वर्ष भरणे – नाश होण्याची वेळ येणे .
- श्रीगणेशा करणे – आरंभ करणे .
- दगा देणे – फसवणे .
- दबा धरून बसणे – टपून बसणे .
- दात धरणे – वैर बाळगणे .
- दाढी धरणे – विनवणी करणे .
- दगडावरची रेघ – खोटे बोलणारे शब्द .
- दाती तृण धरणे – शरणागती पत्करणे .
- दातास दात लावून बसणे – काही न खाता उपाशी राहणे .
- धारातीर्थ पडणे – रणांगणावर मृत्यू येणे .
- धूम ठोकणे – वेगाने पळून जाणे .
- धूळ चारणे – पूर्ण पराभव करणे .
- नजरेत भरणे – उठून दिसणे .
- Read – 2023 मध्ये ब्लॉग कसा तयार करायचा? How To Start Blog in Marathi? click here
- पाठीशी घालणे – संरक्षण देणे .
- पाणी पडणे – वाया जाणे .
- पाणी पाजणे – पराभव करणे .
- पाऊल वाकडे पडणे – वाईट मार्गाने जाणे .
- पोटात घालणे – क्षमा करणे .
- जीव भांड्यात पडणे – काळजी दूर होणे .
- जीव अधीर होणे – उतावीळ होणे .
- डोळे निवणे – समाधान होणे .
- ताळ्यावर आणणे – योग्य समज देणे .
- तळपायाची आग मस्तकात जाणे – अतिशय संताप होणे .
- थांग न लागणे – कल्पना न येणे .
- कपाळमोक्ष होणे – मरण पावणे .
- कायापालट होणे – स्वरूप पूर्णपणे बदलणे .
- कंठस्नान घालणे – ठार मारणे .
- खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे .
- खसखस पिकणे – मोठ्याने हसणे .
- खूणगाठ बांधणे – निश्चय करणे .
- खडे चारणे – शरण येण्यास भाग पाडणे .
- खडे फोडणे – दोष देणे .
- खो घालणे – विघ्न निर्माण करणे .
- घर धुऊन नेणे – सर्वस्वी लुबाडणे .
- घाम गाळणे – खूप कष्ट करणे .
- घोडे मारणे – नुकसान करणे .
- चतुर्भुज होणे – लग्न करणे .
- चंग बांधणे – निश्चय करणे .
- अंग धरणे – लठ्ठ होणे .
- अर्धचंद्र देणे – हकालपट्टी करणे .
- अंगाची लाही होणे – खूप राग येणे .
- अन्नास जागणे – उपकाराची आठवण ठेवणे .
- आकाश फाटणे – चारी बाजूंनी संकटे येणे .
- आच लागणे – झळ लागणे .
- उखळ पांढरे होणे – पुष्कळ फायदा होणे .
- उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती .
- निवास करणे – राहणे .
- सांगड घालणे – मेळ साधणे .
- विहरणे – संचार करणे .
- मान्यता पावणे – सिद्ध होणे .
- कहर करणे – अतिरेक करणे .
- रियाज करणे – सराव करणे .
- पाठिंबा देणे – दुजोरा करणे .
- चेहरा खुलणे – आनंद होणे .
- ओढा असणे – कल असणे .
- समरस होणे – गुंग होणे .
- प्रतिष्ठा लाभणे – मान मिळणे .
- मात करणे – विजय मिळवणे .
- सहभागी होणे – सामील होणे .
- हवालदिल होणे – हताश होणे .
- धुडगूस घालणे – गोंधळ करणे .
- गाडी अडणे – खोळंबा होणे .
- निद्राधीन होणे – झोपणे .
- प्रत्यय येणे – प्रचिती येणे .
- रवाना होणे – निघून जाणे .
- देखभाल करणे – जतन करणे .
- डोळे फिरणे – खुप घाबरणे .
- पाळी येणे – वेळ येणे .
- दडी मारणे – लपून राहणे .
- व्रत घेणे – वसा घेणे .
- प्रतिकार करणे – विरोध करणे .
- टिकाव लागणे – निभाव लागणे .
- हशा पिकणे – हस्यस्फोट होणे .
- वजन पडणे – प्रभाव पडणे .
- बेत करणे – योजना आखणे .
- पदरी घेणे – स्वीकार करणे .
- भ्रमण करणे – भटकंती करणे .
- देखरेख करणे – राखण करणे .
- उदास होणे – खिन्न होणे .
- अमलात आणणे – कारवाई करणे .
- सूड घेणे – बदला घेणे .
- नाळ तोडणे – संबंध तोडणे .
- जिवाची मुंबई करणे – अतिशय चैनबाजी करणे .
- अंगाला होणे – अंगला छान बसणे .
- कच्छपी लागणे – नादी लागणे .
- उसंत मिळणे – वेळ मिळणे .
- दक्षता घेणे – काळजी घेणे .
1) केसाने गळा कापणे .
अर्थ : विश्वासघात करणे .
2) पाणउतारा करणे .
अर्थ : अपमान करणे .
3) दुधात मीठ कालवणे .
अर्थ : एखादयाच्या बसलेल्या घडीचा विचका करणे.
4) लोटांगण घालणे .
अर्थ : शरण जाणे .
5) लोखंडाचे चणे खाणे .
अर्थ : भरपूर परिश्रम घेणे .
It’s really good I liked ur web information about I wanted 😊
thanks sir