150 + मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Vakyaprachar in marathi .

Share

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ :

होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात .

  • भान नसणे – जाणीव नसणे .
  • सर्वस्व पणाला लावणे – सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे .
  • साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे .
  • सामोरे जाणे – निधड्या छातीने संकटास तोंड देणे .
  • साक्षर होणे – लिहिता – वाचता येणे .
  • सुतोवाच करणे – पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे .
  • सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे .
  • स्वप्न भंगणे – मनातील विचार कृतीत न येणे .
  • स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने , गर्वाने अतिशय फुगणे .
  • हट्टाला पेटणे – मुळीच हट्ट न सोडणे .
  • Read – 100+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani in Marathi. click here
  • हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे .
  • हरभऱ्याच्या झाडावर चढवणे – खोटी स्तुती करून मोठेपणा देणे .
  • हसता हसता पुरेवाट होणे – अनावर हसू येणे .
  • हस्तगत करणे – ताब्यात घेणे .
  • हातपाय गळणे – धीर सुटणे .
  • हातचा मळ असणे – सहज शक्य असणे .
  • हात ओला होणे – फायदा होणे .
  • हात टेकणे – नाइलाज झाल्याने माघार घेणे .
  • हात देणे – मदत करणे .
  • हात मारणे – भरपूर खाणे .
  • हाय खाणे – धास्ती घेणे .
  • हातवार तुरी देणे – डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे .
  • हात हलवत परत येणे – काम न होता परत येणे .
  • हात झाडून मोकळे होणे – जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे .
  • हातापाया पडणे – गयावया करणे .
  • हातात कंकण बांधणे – प्रतिज्ञा करणे .
  • हूल देणे – चकवणे .
  • प्रश्नांची सरबत्ती करणे – एकसारखे प्रश्न विचारणे .
  • प्राणावर उदार होणे – जिवाची पर्वा न करणे .
  • फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे .
  • Read – मानसशास्त्र म्हणजे काय ? Psychology in Marathi ? click here
  • फुटाण्यासारखे उडणे – झटकन राग येणे .
  • बारा वाजणे – पूर्ण नाश होणे .
  • बत्तिशी रंगवणे – जोराने थोबाडात मारणे .
  • बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे .
  • बेत हाणून पाडणे – बेत सिद्धीला जाऊ न देणे .
  • बोल लावणे – दोष देणे .
  • बोळयाने दूध पिणे – बुद्धीहीन असणे .
  • भगीरथ प्रयत्न करणे – चिकाटीने प्रयत्न करणे .
  • भारून टाकणे – पूर्णपणे मोहून टाकणे .
  • मान ताठ ठेवणे – स्वाभिमानाने वागणे .
  • माशा मारणे – कोणताही उद्योग न करणे .
  • मिशीवर ताव मारणे – बढाई मारणे .
  • मूग गिळणे – उत्तर न देता गप्प राहणे .
  • मधाचे बोट लावणे – आशा दाखवणे .
  • मनात घर करणे – मनात कायमचे राहणे .
  • मशागत करणे – मेहनत करून निगा राखणे .
  • रक्ताचे पाणी करणे – अतिशय मेहनत करणे .
  • राख होणे – पूर्णपणे नष्ट होणे .
  • राब राब राबणे – सतत खूप मेहनत करणे .
  • राम नसणे – अर्थ नसणे .
  • Read – ChatGpt म्हणजे काय? What is ChatGpt in Marathi? click here
  • राम म्हणणे – मृत्यू येणे .
  • वकीलपत्र घेणे – एखाद्याची बाजू घेणे .
  • वाट लावणे – विल्हेवाट लावणे .
  • वठणीवर आणणे – ताळ्यावर आणणे .
  • वाचा बसणे – एक शब्दही बोलता न येणे .
  • वेड घेऊन पेडगावला जाणे – मुद्दाम डोंग करणे .
  • शिगेला पोचणे – शेवटच्या टोकाला जाणे .
  • शंभर वर्ष भरणे – नाश होण्याची वेळ येणे .
  • श्रीगणेशा करणे – आरंभ करणे .
  • दगा देणे – फसवणे .
  • दबा धरून बसणे – टपून बसणे .
  • दात धरणे – वैर बाळगणे .
  • दाढी धरणे – विनवणी करणे .
  • दगडावरची रेघ – खोटे बोलणारे शब्द .
  • दाती तृण धरणे – शरणागती पत्करणे .
  • दातास दात लावून बसणे – काही न खाता उपाशी राहणे .
  • धारातीर्थ पडणे – रणांगणावर मृत्यू येणे .
  • धूम ठोकणे – वेगाने पळून जाणे .
  • धूळ चारणे – पूर्ण पराभव करणे .
  • नजरेत भरणे – उठून दिसणे .
  • Read 2023 मध्ये ब्लॉग कसा तयार करायचा? How To Start Blog in Marathi? click here
  • पाठीशी घालणे – संरक्षण देणे .
  • पाणी पडणे – वाया जाणे .
  • पाणी पाजणे – पराभव करणे .
  • पाऊल वाकडे पडणे – वाईट मार्गाने जाणे .
  • पोटात घालणे – क्षमा करणे .
  • जीव भांड्यात पडणे – काळजी दूर होणे .
  • जीव अधीर होणे – उतावीळ होणे .
  • डोळे निवणे – समाधान होणे .
  • ताळ्यावर आणणे – योग्य समज देणे .
  • तळपायाची आग मस्तकात जाणे – अतिशय संताप होणे .
  • थांग न लागणे – कल्पना न येणे .
  • कपाळमोक्ष होणे – मरण पावणे .
  • कायापालट होणे – स्वरूप पूर्णपणे बदलणे .
  • कंठस्नान घालणे – ठार मारणे .
  • खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे .
  • खसखस पिकणे – मोठ्याने हसणे .
  • खूणगाठ बांधणे – निश्चय करणे .
  • खडे चारणे – शरण येण्यास भाग पाडणे .
  • खडे फोडणे – दोष देणे .
  • खो घालणे – विघ्न निर्माण करणे .
  • घर धुऊन नेणे – सर्वस्वी लुबाडणे .
  • घाम गाळणे – खूप कष्ट करणे .
  • घोडे मारणे – नुकसान करणे .
  • चतुर्भुज होणे – लग्न करणे .
  • चंग बांधणे – निश्चय करणे .
  • अंग धरणे – लठ्ठ होणे .
  • अर्धचंद्र देणे – हकालपट्टी करणे .
  • अंगाची लाही होणे – खूप राग येणे .
  • अन्नास जागणे – उपकाराची आठवण ठेवणे .
  • आकाश फाटणे – चारी बाजूंनी संकटे येणे .
  • आच लागणे – झळ लागणे .
  • उखळ पांढरे होणे – पुष्कळ फायदा होणे .
  • उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती .
  • निवास करणे – राहणे .
  • सांगड घालणे – मेळ साधणे .
  • विहरणे – संचार करणे .
  • मान्यता पावणे – सिद्ध होणे .
  • कहर करणे – अतिरेक करणे .
  • रियाज करणे – सराव करणे .
  • पाठिंबा देणे – दुजोरा करणे .
  • चेहरा खुलणे – आनंद होणे .
  • ओढा असणे – कल असणे .
  • समरस होणे – गुंग होणे .
  • प्रतिष्ठा लाभणे – मान मिळणे .
  • मात करणे – विजय मिळवणे .
  • सहभागी होणे – सामील होणे .
  • हवालदिल होणे – हताश होणे .
  • धुडगूस घालणे – गोंधळ करणे .
  • गाडी अडणे – खोळंबा होणे .
  • निद्राधीन होणे – झोपणे .
  • प्रत्यय येणे – प्रचिती येणे .
  • रवाना होणे – निघून जाणे .
  • देखभाल करणे – जतन करणे .
  • डोळे फिरणे – खुप घाबरणे .
  • पाळी येणे – वेळ येणे .
  • दडी मारणे – लपून राहणे .
  • व्रत घेणे – वसा घेणे .
  • प्रतिकार करणे – विरोध करणे .
  • टिकाव लागणे – निभाव लागणे .
  • हशा पिकणे – हस्यस्फोट होणे .
  • वजन पडणे – प्रभाव पडणे .
  • बेत करणे – योजना आखणे .
  • पदरी घेणे – स्वीकार करणे .
  • भ्रमण करणे – भटकंती करणे .
  • देखरेख करणे – राखण करणे .
  • उदास होणे – खिन्न होणे .
  • अमलात आणणे – कारवाई करणे .
  • सूड घेणे – बदला घेणे .
  • नाळ तोडणे – संबंध तोडणे .
  • जिवाची मुंबई करणे – अतिशय चैनबाजी करणे .
  • अंगाला होणे – अंगला छान बसणे .
  • कच्छपी लागणे – नादी लागणे .
  • उसंत मिळणे – वेळ मिळणे .
  • दक्षता घेणे – काळजी घेणे .

1) केसाने गळा कापणे .

अर्थ : विश्वासघात करणे .

2) पाणउतारा करणे .

अर्थ : अपमान करणे .

3) दुधात मीठ कालवणे .

अर्थ : एखादयाच्या बसलेल्या घडीचा विचका करणे.

4) लोटांगण घालणे .

अर्थ : शरण जाणे .

5) लोखंडाचे चणे खाणे .

अर्थ : भरपूर परिश्रम घेणे .


Share

2 thoughts on “150 + मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Vakyaprachar in marathi .”

Leave a comment