2023 मध्ये ब्लॉग कसा तयार करायचा? How To Start Blog in Marathi?

Share

ब्लॉग म्हणजे Google वरती वेबसाईटचा एक प्रकार आहे. ब्लॉग म्हणजे आपण स्वतःची वेबसाईट तयार करून त्याच्यामध्ये Content (सामग्री) लिहून आपल्याला माहित असलेली माहिती इतरांपर्यंत पोहविण्यासाठी ब्लॉग हे महत्वाचे साधन आहे.

ब्लॉग बनवण्यासाठी Blogger.com आणि WordPress.com या दोन्ही माध्यमांमधून आपण आपला स्वतःचा ब्लॉग बनवू शकतो. त्यातील १) Blogger हे free मधील ब्लॉग बनवायचे साधन आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या website चे नाव खरेदी करावे लागते याला Domain name असे बोलतात. Domain name खरेदी करण्यासाठी GoDaddy, Namecheap,Dynadot, Bigrock यांच्यामाध्यमातून तुम्ही तुमचे आवडते Domain name खरेदी करू शकता. Blogger मध्ये तुम्हाला Hosting free मध्ये भेटते. २)Wordprees वरती Blog बनवण्यासाठी तुम्हाला Domain name आणि Hosting दोन्हीही खरेदी करावे लागते.

Wordprees वरती Blog बनवायची प्रक्रिया

business coffee composition computer
  • Wordprees वरती Blog तयार करण्यासाठी वरीलप्रमाणे तुम्हाला Domain name खरेदी करावे लागेल. मी तुमच्यासाठी सुचवलेले Domain name साठी माध्यम आहे GoDaddy.com याच्यावरती जावून तुम्ही तुमचे Domain name खरेदी करू शकता.
  • Domain name खरेदी केल्यानंतर सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे Hosting. याच्यामध्ये तुम्ही website वरती लिहिलेली माहिती साठवली जाते. तुम्ही नवीन website तयार करत असल्यामुळे मी तुमच्यासाठी सुचवलेले माध्यम Hostinger.in हे आहे याच्यावरती जावून तुम्ही Hostinger मध्ये account खोलू शकता.
  • Domain name आणि hosting दोन्ही एकाच माध्यमाचे असतील तर त्याच्यामध्ये nameserver बदलण्याची गरज नाही. जर दोन्हीही वेगवेगळ्या माध्यमाचे असतील तर hosting चे nameserver हे Domain name ला जोडणे आवश्यक आहे.
  • Hostinger मध्ये लॉगिन करून wordpress साठी username आणि password जोडणे आवश्यक आहे. याच्यानंतर तुम्ही Hostinger च्या dashbord वरून तुम्ही डायरेक्ट तुमच्या website वरती लॉगिन होऊ शकता नाहीतर दुसरा पर्याय https://websitename.in/wp-login.php असा आहे याच्यामध्ये तुम्ही .in घेतले असेल तर in लावणे , .com घेतले असेल तर com लावणे महत्वाचे आहे.
  • Wordprees वरती लॉगिन केल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे website डिझाईन करणे होय . याच्यामध्ये सर्वात पाहिले Themes जोडणे . मी तुमच्यासाठी सुचवलेली Themes चे नाव Generatepress आहे. WordPress वरती तुम्हाला भरपूर Themes भेटतील पण त्यामधील सर्वात चांगली Themes Generatepress आहे.

WordPress वरील महत्वाचे plugins

  • Akismet Anti-Spam
  • Easy Table of Contents
  • Jetpack
  • LiteSpeed Cache
  • Rank Math SEO
  • Recent Posts Widget With Thumbnails
  • Site Kit by Google
  • Smush
  • WPForms Lite
  • Yoast SEO

Plugins installed केल्यानंतर पोस्ट लिहण्यास सुरुवात करावी.

ब्लॉग लिहून विविध प्रकारे पैसे कमवायचे पर्याय

  • Google Adsense वरून तुम्ही पैसे कमवू शकता . याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 50 पोस्ट लिहणे आवश्यक आहे. पोस्ट लिहिल्यानंतर तुम्ही Google Adsense साठी मान्यता देण्यात येते . तुमच्या website वरती traffic किती येते हे महत्वाचे आहे. जेवढे traffic तेवढ्या प्रमाणात तुम्ही पैसे कमवू शकता.
  • Affiliate marketing करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. Affiliate marketing म्हणजे एखाद्याने तुमच्या लिंक वरून वस्तू खरेदी केली तर त्यातील काही प्रमाणात तुम्हाला कमिशन भेटते. अश्या प्रकारे सुद्धा पैसे कमवू शकता. Affiliate marketing करण्यासाठी ज्या कंपनीच्या वस्तू विकण्यासाठी तुम्ही लिंक देणार आहात त्या कंपनीमध्ये तुमचे affiliate program चे अकाउंट असणे आवश्यक असते.


Share

Leave a comment