विभक्ती :
- नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात , त्या विकरांना विभक्ती असे म्हणतात . लिंग , वचन , विभक्तीमुळे नामाच्या मूळ रूपात विकार होतात .
- नामाचा / सर्वनामाचा क्रियापद किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविण्यासाठी जी गटवार विभागणी केली जाते त्यालाच विभक्ती असे म्हणतात .
विभक्ती , विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ
विभक्ती | एकवचन | अनेकवचन | कारकार्थ |
प्रथमा | —— | —— | कर्ता |
द्वितीया | स , ला , ते | स , ला , ना , ते | कर्म |
तृतीया | ने , ए , शी | नी ,शी , ई , ही | करण ( साधन ) |
चतुर्थी | स , ला , ते | स , ला , ना , ते | संप्रदान ( दान/भेट ) |
पंचमी | ऊन , हून | ऊन , हून | अपादान ( दुरावा) |
षष्ठी | चा , ची , चे | चे , ची , च्या | संबंध |
सप्तमी | त , ई , आ | त , ई , आ | अधिकरण (स्थळ / वेळ ) |
संबोधन | —— | नो | हाक |
प्रथमा
- रावण राक्षस होता .
- रामरावांनी पाच पोती धान्य पिकविले .
- मी चार मैल चालतो .
- दूध वीस रुपये लिटर मिळते .
- बंटी गाय बांधतो .
द्वितीया
- राजाने प्रधानाला बोलावले .
- पोलिसाने चोरास पकडले .
- मी सहलीला चाललो .
- शेतकरी म्हैशीला बांधतो .
- राम रावणाला मारतो .
- अधिक वाचा 100+ समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in marathi.
तृतीया
- ती तोऱ्याने चालते .
- घर पावसाने पडले .
- तो कानाने बहिरा आहे .
- साखर किलोने मिळते .
- ती चार इंचानी कमी भरते .
- कुत्रा पायथ्याशी बसला .
- काका चार वर्षांनी येतात .
- आम्ही शेताच्या कडेने झाडे लावली .
- कृष्णाने जरासंधास मारले .
- महेश लेखणीने लिहितो .
चतुर्थी
- मुलगी लग्नाला आली .
- तो बालपणीस आईस मुकला .
- तात्याला मोटार आहे .
- त्याच्या डोळ्याला धार लागली .
- तो रेल्वेस लटकून गेला .
- त्याच्या डोक्याला रुमाल आहे .
- नदी सागराला भेटते .
- मी खेळायला जातो .
- दुधासाठी लिटरला दहा रुपये पडतात .
- त्याला मुलगा आहे .
पंचमी
- पुण्याहून सातारा 110 कि. मी. आहे .
- खेड्याहून शहर मोठे असते .
- घोड्याहून खेचर दिसायला वेगळे आहे .
- साप बिळातून बाहेर गेला .
- फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते .
- अधिक वाचा 100+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd in Marathi .
षष्ठी
- तमाशाला गावच्या गाव लोटला .
- मला घोड्याची गाडी आवडते .
- तो रामचा भाऊ आहे .
- ती लग्नाची मुलगी आहे .
- ती काकांची मोटार आहे .
- ती मुलाची आई आहे .
- ती तांब्याची मूर्ती आहे .
- मी रुपयाची भाजी आणली .
- बर्फाचे पाणी झाले .
- जेवायची खोली बंद आहे .
सप्तमी
- दारूपायी त्याने घरदार विकले .
- तो गणितात कच्चा आहे .
- त्याने वाद्यात ठेका धरला .
- त्याची बायको लाखात देखणी आहे .
- तो गावी गेला .
- मी संध्याकाळी अभ्यास करतो .
- माझ्या घरात चार माणसे आहेत .
- मी पायी शाळेत जातो .
संबोधन
ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात . संबोधनाला अनेकवचनात प्रत्यय लागतात . त्याचबरोबर त्यांचा विकारही होतो . सर्वनामांना हाक मारता येत नाही , त्यामुळे त्यांची संबोधन विभक्ती होत नाही .
- मुलांनो रांगेत उभे रहा .
- रामा , पाणी आण .
- अधिक वाचा 100+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani in Marathi.
महत्वाचे :
- ज्याही एकवचनी / अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही त्याची विभक्ती प्रथमा असते .
- द्वितीया व चतुर्थी यांचे प्रत्यय सारखेच आहे .
- तृतीयेला फक्त अनेकवचनात ई प्रत्यय आहे ; परंतु सप्तमीला मात्र दोन्ही वचनात ई प्रत्यय आहे .
- फक्त अनेकवचनात प्रत्यय असणारी विभक्ती संबोधन आहे .
1)सप्तमी विभक्तीची प्रत्यये कोणती ?
Ans. त , ई , आ
2)करण म्हणजे काय ?
Ans. क्रियेचे साधन किंवा वाहन
3) षष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती ?
Ans. चा , ची , चे
4)गोपीने विभक्ती ओळखा ?
Ans. तृतीया
5) पुस्तके विभक्ती ओळखा ?
Ans. प्रथमा